"कंगनाने कान पकडून माफी मागावी"; काँग्रेसचा जोरदार हल्लाबोल, भाजपाला विचारले 'हे' सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2024 01:36 PM2024-08-26T13:36:33+5:302024-08-26T13:42:22+5:30
Kangana Ranaut : भाजपा खासदार कंगना राणौत आपल्या भाषणामुळे पुन्हा एकदा विरोधकांच्या निशाण्यावर आली आहे. यावरून काँग्रेसचे नेते कंगनावर सतत जोरदार हल्लाबोल करत आहेत.
अभिनेत्री आणि हिमाचल प्रदेशच्या मंडी मतदारसंघातील भाजपा खासदार कंगना राणौत आपल्या भाषणामुळे पुन्हा एकदा विरोधकांच्या निशाण्यावर आली आहे. यावरून काँग्रेसचे नेते कंगनावर सतत जोरदार हल्लाबोल करत आहेत आणि त्यांनी या मुद्द्यावर भाजपाला काही प्रश्नही विचारले आहेत. काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. तसेच "कंगनाने कान पकडून माफी मागावी" असंही म्हटलं आहे.
कंगनाने केलेलं विधान शेअर करत सुप्रिया श्रीनेत म्हणाल्या की, "हे कंगनाजींचे वैयक्तिक मत आहे की भाजपा आणि सरकारचं मत आहे? अमेरिका आणि चीन आपल्या देशाला अस्थिर करत आहेत असं भाजपा आणि सरकारलाही वाटत आहे का? जर मोदी सरकारला असं वाटत असेल की विदेशी शक्ती आपल्या देशाच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करत आहेत, तर याबाबत काय पावलं उचलली जात आहेत?"
BJP सांसद कंगना जी का लेटेस्ट बयान है कि “किसान आंदोलन में लंबी प्लानिंग थी, बांग्लादेश जैसी. और इसके पीछे चीन अमेरिका जैसी विदेशी शक्तियों काम कर रहीं हैं”
— Supriya Shrinate (@SupriyaShrinate) August 25, 2024
1) क्या यह कंगना जी की निजी राय है या यह BJP और सरकार का मत है?
2) क्या BJP और सरकार भी यह मानती है कि अमेरिका और चीन… pic.twitter.com/7I5dmNrGqN
"भाजपाच्या नेत्यांनी शेतकऱ्यांसाठी खूप अपशब्द वापरले, आता त्यांचे खासदारही शेतकऱ्यांना मारेकरी आणि बलात्कारी म्हणत आहेत. याचं उत्तर आम्ही नाही तर अवघ्या काही दिवसांत हरियाणा देईल. पण या विधानामुळे राष्ट्रीय सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, त्यामुळे भाजपा आणि सरकारला उत्तर द्यावं लागेल आणि तसं नसेल तर या खासदारांनी कान धरून माफी मागावी!"
काँग्रेसचे नेते रणदीप सुरजेवाला यांनीही कंगनाच्या या विधानाचा निषेध केला आहे. "कंगना लवकर बरी हो, भाजपाचे लोक देशाच्या अन्नदाताचा इतका तिरस्कार का करतात? भाजपाने नेहमीच खोटे सांगितलं, फसवलं, षडयंत्र रचलं आणि आमच्या अन्नदात्यांवर अत्याचार केले आणि पुन्हा एकदा भाजपा खासदाराने आमच्या अन्नदात्यांवर बेताल आरोप केले आहेत" असं सुरजेवाला यांनी म्हटलं आहे.