मुंबई - सुशांत सिंह राजपूत प्रकरणावर कंगना रणौत सातत्याने काहीना काही भाष्य करतच आहे. यातच आता कंगना आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यात वाकयुद्ध पेटले आहे. कंगनाने पुन्हा एकदा संजय राऊतांवर ट्विटरच्या माध्यमातून निशाणा साधला आहे.
कंगना म्हणाली, अवॉर्ड वापसी गँगला किंमत देत नाही -कंगनाने एक ट्विट रिट्वीट केले आहे, यात लिहिले आहे, "जेव्हा दीपिका पदुकोणला एका छोठ्या-मोठ्या भाजपा नेत्याने धमकी दिली, तेव्हा संपूर्ण लिबरल गँग मोदीजींच्या विरोधात उभी राहिली होती आणि भारत असुरक्षित असल्याचे म्हटले होते. मात्र, आता कंगना असुरक्षित असल्याचे बोलत आहे, तर हे कंगना व्हर्सेस मुंबई होते. का त्यांच्याच लाज शिल्लक आहे?"
हे रिट्विट करत कंगनाने लिहिले आहे, "मी एका मध्यमवर्गीय कुटुंबातून येते, माझे पालक फॅन्सी नाहीत, आम्ही सामान्य लोक आहोत. तर सुशांत प्रमाणेच माझ्या रक्तातही अवॉर्ड वापसी आणि कँडल मार्च गँगसाठी कसलीही किंमत नही. ते कधीही आमच्यासाठी बोलणार नाहीत. शेम ऑन संजय राऊत."
यापूर्वीही साधला होता राऊतांवर निशाणा -यापूर्वीही कंनाने ट्विट करत संजय राऊतांवर निशाणा साधला होता. ती म्हणाली होती, 'संजय राऊतांनी मला खुली धमकी दिली आहे. मुंबई पोलिसांची भीती वाटत असल्यास पुन्हा शहरात येऊ नको, असे त्यांनी म्हटले आहे. पूर्वी मुंबईत आझादीचे फलक झळकले आणि आता उघड धमक्या मिळत आहेत. ही मुंबई पाकिस्तानव्याप्त काश्मीरसारखी का वाटू लागली आहे?'
कंगना आणि राउतांच्या वादात आप नेत्याची उडी -कंगना आणि राउतांच्या वादात आम आदमी पार्टीच्या राष्ट्रीय प्रवक्ता प्रीती शर्मा मेनन यांनीही उडी घेतली आहे. त्यांनीही एक ट्विट करत, “राजकीय अजंड्यालाही एक मर्यादा असते. आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राच्या हृदयाचा अपमान कसा करू शकता? ज्या मुंबईत स्वतःच करियर बनवलं त्या मुंबईलाच पाकिस्तान म्हणताना तुला लाज कशी नाही वाटली?”, असे म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या -
पंतप्रधान इम्रान खान यांचे निकटवर्तीय जनरल बाजवांनी पाकिस्तान लुटला, जमवली अब्जावधींची संपत्ती?
पंतप्रधान मोदींनी आतापर्यंत 103 कोटी रुपये केले दान; जाणून घ्या, केव्हा, कोठे अणि कशासाठी दिले