बलद्वाडा: मुंबईवरील पीओके आणि मुंबई पोलिसांवरील माफियाच्या तुलनेनंतर अभिनेत्री कंगना राणौतला धडा शिकविण्याची धमकी शिवसेनेच्या नेत्यांनी दिली होती. यामुळे कंगनाने केंद्र सरकारकडे सुरक्षा देण्याची मागणी केली होती. यानुसार केंद्राने कंगनाला वाय दर्जाची सुरुक्षा देत मुंबईला आणले. यावर कंगनाच्या आईने मोठी घोषणा केली आहे.
कंगनाला वाय प्लस सुरक्षा देऊन आणि हिमाचलच्या जयराम ठाकूर सरकारनेही सुरक्षा पुरविल्याने आम्ही भाजपाचे झालो आहोत, असे वक्तव्य कंगनाची आई आशा राणौत यांनी केले आहे. कंगनाच्या मूळ घरी भाजपाचे नेते आणि कार्यकर्ते गेले होते. तेव्हा आशा यांनी हे वक्तव्य केले आहे. भाजपाच्या नेत्यांनी त्यांना आम्ही कंगनासोबत असल्याचे म्हटले आहे. तसेच घाबरण्याची आवश्यकता नाही. हिमाचलच्या बेडर मुलीचे कोणीही काहीही वाकडे करू शकत नाही, असे आश्वासन दिले.
यावर कंगनाच्या आईने मोदी सरकार आणि हिमाचल सरकाचे आभार व्यक्त केले. ''आमचे कुटुंबीय गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेससोबत होतो. मात्र, मोदी सरकारने आमचे हृदय जिंकले आहे. यामुळे आता आम्ही पूर्णपणे भाजपाचे झालो आहोत.''
कंगनालाही राजकीय पार्श्वभूमी कंगनालाही राजकीय पार्श्वभूमी आहे. तिचे पणजोबा सरजू सिंह गोपालपूरचे आमदार होते. त्या आधीपासून त्यांचे कुटुंबीय काँग्रेसी विचारधारेचे समर्थ राहिले आहे. मात्र, कंगना गेल्या काही काळापासून पंतप्रधान नरेंद्र मोदींची स्तुती करते. यामुळे कंगना पुढील काळात भाजपात दिसल्यास आश्चर्य वाटायला नको. तिच्या आईनेही आज तसेच संकेत दिले आहेत. शांता कुमार यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र पाठवून कंगनाला सुरक्षा पुरविण्याची मागणी केली आहे.
रॅपीड अँटीजेन टेस्ट निगेटीव्ह आल्यास पुन्हा आरटी-पीसीआर टेस्ट होणार; केंद्र सरकारचे आदेश
२ कोटींचे नुकसान
महाराष्ट्र सरकारने उचललेल्या पावलावरून कंगना नाराज असून ते ऑफिस तिच्यासाठी स्वप्नांचे ऑफिस होते. वकिलाने हे देखील सांगितले की, महापालिकेने ही कारवाई कोणाच्या तरी सांगण्यावरून केलेली आहे. कंगनाच्या ऑफिसचे जेवढे नुकसान झाले आहे त्याची एकूण रक्कम 2 कोटींच्या घरात जाते. तसेच कंगनाने उच्च न्यायालयात बीएमसीने बेकायदा कारवाई केल्याचे अॅफिडेव्हीट दिले आहे. बीएमसी अधिकाऱ्यांच्याविरोधात कारवाई करणार असे तिचे म्हणणे आहे. आज तकने सिद्दीकी यांची मुलाखत घेतली आहे.
कंगनाचे ऑफिस तोडल्यानंतर दुसऱ्या दिवशीही राजकीय वातावरण तापलेले असून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरुच आहेत. शिवसेना विरुद्ध बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौत वादात हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी उडी घेतली आहे. कंगनी ही हिमालच प्रदेशची कन्या आहे. त्यामुळे, ठाकूर यांनी कंगनाला आपला पाठिंबा देत शिवसेनेला टार्गेट केलंय. 'आम्ही हिमाचलच्या सुपुत्रीचा अपमान सहन करणार नाही' असं म्हणत त्यांनी कंगनावर महाराष्ट्र सरकारकडून सूडाच्या भावनेनं अत्याचार होत असल्याचं म्हटंलय.
कंगनाचा शिवसेनेवर पुन्हा निशाणाज्या विचारधारेवर बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केली, आज ते सत्तेसाठी ती विचारधारा विकून शिवसेना ते सोनिया सेना बनली आहे, ज्या गुंडांनी माझ्यामागे माझं घर तोडलं त्यांना सिविक बॉडी म्हणू नका, संविधानाचा इतका मोठा अपमान करु नका अशा शब्दात कंगना राणौतनं शिवसेनेवर आरोप केला आहे.
तुकाराम मुंढेंची पुन्हा बदली; जीवन प्राधिकरणात रूजू होण्याआधीच निघाले आदेश
दोन कोटींचे नुकसान; कंगना मुंबई महापालिकेवर गुन्हा दाखल करणार
नशीब म्हणतात! लॉकडाऊनमध्ये घर सफाईवेळी जॅक'पॉट' लागला; किंमत ऐकूनच भिरभिरला
मुकेश अंबानींना तगडा भिडू मिळणार; 'जगज्जेता' 20 अब्ज डॉलर गुंतवण्याच्या तयारीत
Reliance Jio दणका करणार; स्वस्त किंमतीचे 1 कोटी स्मार्टफोन विकणार
WhatsApp वरील समाजकंटकांपासून कसे वाचाल? जाणून घ्या टिप्स अन् रहा सुरक्षित