मुंबईला पीओके म्हटल्याने अभिनेत्री कंगना राणौतविरोधात संतप्त वातावरण तयार झाले आहे. उद्या मुंबईत तिच्यासमोर काय वाढून ठेवले आहे याची कल्पना नसतानाच तिच्यावर विधानपरिषदेत हक्कभंग प्रस्ताव सादर झाला आहे. अशा परिस्थितीत कंगना वाय प्लस सुरक्षेमध्ये मनालीच्या घरातून मुंबईकडे निघाली आहे.
कंगनाच्या घरी सकाळी 10.40 वाजता हिमाचल प्रदेश पोलीस आणि सीआरपीएफची बैठक झाली. यामध्ये कंगनाचा मुंबईला जाण्याचा रुट मॅप तयार करण्यात आला. यानंतर कंगना मुंबईकडे निघाल्याचे वृत्त आहे. सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाने आता वेगळेच वळण घेतले असून त्याची हत्या केल्याचे आरोप असलेली रिया चक्रवर्ती ड्रग्जच्या आरोपाखाली तुरुंगात जाण्याच्या मार्गावर आहे. सीबीआयने सुशांतची हत्या झाल्याचे धागेदोरे दिसत नसल्याचे स्पष्ट केल्याने सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाकडे आणि तपासाकडे दुर्लक्ष होऊ लागले आहे. यातच आता रिया आणि कंगना प्रसिद्धीच्या झोतात आहेत.
रियावर एनसीबी आणि कंगनावर महाराष्ट्र सरकार असा आता सामना रंगला आहे. कंगनाच्या कार्यालयामध्ये अनधिकृत बांधकाम केल्याचा आरोप मुंबई महापालिकेने केला आहे. आजच तिच्या ऑफिसवर नोटीस चिकटविण्यात आली आहे. यामध्ये काय काय अवैध बांधकाम केले याचे फोटोही दिले आहेत. यातच बीएमसीने कंगनाला कायदा कलम 354(A) नुसार घरातून काम करू शकत नसल्याची नोटीस पाठविली आहे.
तसेच पुढील 24 तासांत कंगनाला ऑफिसच्या रिन्यूएशनचे सारे कागदपत्र जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासाठी कंगनाकडे उद्या सकाळी 10 वाजेपर्यंतच वेळ आहे. कंगनाने 9 सप्टेंबरला मी मुंबईत येत असून हिम्मत असेल तर हात लावून दाखवा, असे आव्हान दिले होते. मात्र, कंगनाने महापालिकेची कारवाई पाहून एक दिवस अधिच निघण्याचा निर्णय घेतला. यासाठी तिने विमानसेवा पुरविणाऱ्या हेलिकॉप्टर, चार्टर प्लेनसाठीही प्रयत्न करून पाहिले.
महत्वाच्या बातम्या...
मुंबईला पीओके बोलणे कंगनाला भोवले; विधानपरिषदेत हक्कभंग प्रस्ताव
सुशांतचे 15 कोटी रुपये कुठे 'गायब' झाले? स्टिंग ऑपरेशनमध्ये मोठा खुलासा
निधड्या भारताची सिक्रेट फोर्स; मोदींच्या दूताची लडाखमध्ये शहीद जवानास मानवंदना
Video: भारताकडे अभेद्य शक्ती! DRDO ला मोठे यश; हाइपरसोनिक मिसाईलची चाचणी
Video: 100 लष्करी वाहने, 1000 सैनिक; घुसखोरीत हरले म्हणून चीनचा सीमेवर युद्धसराव