कान्हा नॅशनल पार्क झाला नक्षल छावणी, वन्यजीव व पर्यावरणवाद्यांमध्ये चिंता; कर्मचाऱ्यांमध्ये भीती

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2022 07:02 AM2022-04-05T07:02:19+5:302022-04-05T07:03:06+5:30

Kanha National Park News: मध्य प्रदेशमधील ख्यातनाम कान्हा नॅशनल पार्कचे रूपांतर जवळपास नक्षल छावणीत झाले असून, वन्यजीव व पर्यावरणवाद्यांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. कान्हा नॅशनल पार्कचा विस्तार छत्तीसगडच्या सीमेवरील दोन आदिवासी जिल्ह्यांत झाला आहे.

Kanha National Park becomes Naxal camp, concern among wildlife and environmentalists; Fear among employees | कान्हा नॅशनल पार्क झाला नक्षल छावणी, वन्यजीव व पर्यावरणवाद्यांमध्ये चिंता; कर्मचाऱ्यांमध्ये भीती

कान्हा नॅशनल पार्क झाला नक्षल छावणी, वन्यजीव व पर्यावरणवाद्यांमध्ये चिंता; कर्मचाऱ्यांमध्ये भीती

Next

- अभिलाष खांडेकर
भोपाळ : मध्य प्रदेशमधील ख्यातनाम कान्हा नॅशनल पार्कचे रूपांतर जवळपास नक्षल छावणीत झाले असून, वन्यजीव व पर्यावरणवाद्यांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. कान्हा नॅशनल पार्कचा विस्तार छत्तीसगडच्या सीमेवरील दोन आदिवासी जिल्ह्यांत झाला आहे.

काही वर्षांपासून नक्षली नॅशनल पार्कच्या अंतर्गत जंगलात सक्रिय आहेतच, आता त्यांनी वाघांसाठी सुरक्षित स्थळ असलेल्या भागातही शिरकाव केला आहे, असे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना म्हटले. “येथील परिस्थिती अतिशय गंभीर असून, गेल्या दशकांत छत्तीसगडची दोन व्याघ्र अभयारण्ये जशी गमावली, ती अवस्था कान्हाची होते की काय, अशी भीती मला वाटते,” असे पार्कच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सोमवारी छत्तीसगडमधील नक्षलींच्या उपद्रवाचा उल्लेख करून म्हटले. छत्तीसगडमध्ये उदांती आणि इंद्रावती व्याघ्र अभयारण्यांचा ताबा फार पूर्वीच नक्षलींच्या वेगवेगळ्या दलमनी घेतला असून, ते वाघांची मोजणी थांबवितात.

कान्हातील व्याघ्र राखीव क्षेत्राचा जवळपास ८० टक्के भाग हा नक्षलींच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष नियंत्रणाखाली असून, त्यांनी छत्तीसगड आणि महाराष्ट्र पोलिसांनी दडपण वाढविल्यावर आपल्या कारवाया विस्तारल्या आहेत. मोचा आणि खाटिया दलमची स्थानिक पातळीवर शक्ती वाढली असून, वनविभागाचे कनिष्ठ पातळीवरील कर्मचारी कर्तव्य बजावण्यास फार घाबरतात. 

परिस्थिती हाताबाहेर जाईल
माजी मुख्य वन्यजीव वॉर्डन एच.एस. पाबला ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले की, “केंद्र सरकार आणि मध्य प्रदेश सरकारच्या अत्यंत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत या स्फाेटक परिस्थितीवर विचार व्हायला हवा होता. पर्यटकाचे अपहरण झाले किंवा त्याची हत्या केली गेली, तर परिस्थिती पूर्णपणे हाताबाहेर जाईल.”

Web Title: Kanha National Park becomes Naxal camp, concern among wildlife and environmentalists; Fear among employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.