नवी दिल्ली : देशद्रोहाच्या आरोपात अटकेत असलेला जेएनयूमधील विद्यार्थी संघाचा अध्यक्ष कन्हैया कुमारला दिल्ली हायकोर्टाने बुधवारी सहा महिन्यांसाठी अंतरिम जामीन मंजूर केला. तपासात पूर्ण सहकार्य करण्याचे व गरज पडल्यास तपास यंत्रणांच्या समक्ष हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने त्याला दिले आहेत. त्याला १0 हजार रुपयांचा वैयक्तिक जातमुचलका व तेवढ्याच रकमेच्या हमीवर जामीन मंजूर केला. कन्हैयासाठी जेएनयूच्या एखाद्या विभागाच्या सदस्याला हमीदार बनावे लागेल, असेही कोर्टाने स्पष्ट केले. न्यायालयाच्या आदेशातील अटींचे उल्लंघन करणार नाही, अशा आशयाचे प्रतिज्ञापत्र कन्हैयाला सादर करावे लागेल.
कन्हैया कुमारला अखेर जामीन मंजूर
By admin | Published: March 03, 2016 5:01 AM