शहरं
Join us  
Trending Stories
1
"शाहू महाराजांना फोन आला अन् मधुरिमाराजेंनी..."; शेवटच्या १० मिनिटांत घडलेल्या राजकीय भूकंपाचे कारण समोर
2
त्यांनी बाळासाहेबांचे विचार आणि धनुष्यबाण गहाण ठेवले होते; शिंदेंसाठी CM शिंदेंची बॅटिंग, ठाकरेंवर हल्ला
3
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर; स्पष्टच बोलले
4
भाजपाला मोठा धक्का, अपक्ष निवडणूक लढवत असलेल्या माजी महिला खासदाराचा पक्षाला राम राम
5
“कोल्हापूर उत्तर आम्ही ७ वेळा जिंकली, ७ दिवस भांडलो पण काँग्रेसने जागा सोडली नाही”: संजय राऊत
6
नवाब मलिकांवरून अजितदादा गटाने भाजपा-शिंदे गटाला फटकारलं; "कुणाला काही वाटू दे..."
7
राजेश लाटकर घेणार उद्धव ठाकरेंची भेट! कोल्हापुरात राजकीय घडामोडींना वेग
8
काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातून यंदा काँग्रेसचेच चिन्ह झाले 'हद्दपार'
9
AUS vs IND : भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा! टीम इंडियासमोर मोठे आव्हान, शिखर धवननं दिला धीर
10
Sameer Bhujbal : दहा अपक्ष उमेदवारांनी माघार घेत समीर भुजबळ यांना दिला पाठिंबा
11
विराट कोहलीसाठी सिक्सर किंग युवीनं शेअर केली खास पोस्ट
12
महाले यांची माघार; भुजबळ, आहेर, गावित ठाम! दिंडोरीत नरहरी झिरवाळ यांना दिलासा
13
"मी यापुढे मराठी बोलणार नाही..."; रेल्वे टीसीचा मुजोरपणा, मराठी माणसाला धमकावलं
14
चातुर्मासाची सांगता: कार्तिकी एकादशी कधी आहे? विष्णुप्रबोधोत्सव महात्म्य अन् मान्यता
15
बारामतीचं राजकीय तापमान वाढणार: अजित पवारांना शह देण्यासाठी शरद पवार मैदानात; आज ६ ठिकाणी सभा!
16
Niva Bupa IPO : 'या' दिग्गज हेल्थ इन्शूरन्स कंपनीचा IPO येणार; किंमत किती, कधीपासून करता येणार अर्ज?
17
...यासाठी बाळासाहेब ठाकरे राज ठाकरेंना माफ करणार नाहीत; संजय राऊत भडकले
18
आजपासून महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ; पहिली सभा कोल्हापुरात, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार!
19
शुक्राचा गुरु राशीत प्रवेश: १० राशींवर धनलक्ष्मी कृपा, अचानक धनलाभाचे योग; शुभ-लाभाचा काळ!
20
Devayani Farande : मध्य नाशिक मतदारसंघात बंडखोरांच्या माघारीचा भाजपाच्या देवयानी फरांदेंना फायदा

'काँग्रेस वाचली नाही, तर देशही वाचणार नाही'; कन्हैया, जिग्नेश यांनी सांगितलं काँग्रेसमध्ये सामील होण्याचं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2021 7:19 PM

'जो सर्वात मोठा विरोधी पक्ष आहे, तो वाचवता आला नाही, तर देशही वाचणार नाही. जर मोठे जहाज वाचले नाही, तर लहान बोटीही वाचणार नाहीत.'

नवी दिल्ली - कन्हैया कुमार आणि जिग्नेश मेवानी यांनी मंगळवारी राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यानंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत कन्हैया कुमारने, आपण काँग्रेसमध्ये का सामील झालो हे सांगितले. कन्हैया म्हणाला, मला वाटते, की या देशात काही लोक, ते केवळ लोक नाही, तर एक विचार आहे. या देशाची चिंतन परंपरा, संस्कृती, इतिहास, वर्तमान आणि भविष्य खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत. मी कुठे तरी वाचले होते, की तुम्ही सर्वप्रथन तुमच्या शत्रूची निवड करा. मित्र, अपोआप तयार होतील. तर मी निवड केली आहे. लोकशाही पक्षात आम्ही यामुळे सामील होत आहोत, कारण जर काँग्रेस वाचली नाही, तर देशही वाचणार नाही, असे आता वाटू लागले आहे. 

कन्हैया म्हणाला, मी स्पष्टपणे सांगतो, की पंतप्रधान आजही आहेत, कालही होते आणि भविष्यातही होतील. पण आज आम्ही राहुल गांधींच्या उपस्थितीत फॉर्म भरत होतो, तेव्हा सहकारी जिग्नेशने एक संविधानाची प्रत आणि मी गांधी-आंबेडकर आणि भगतसिंग यांचा फोटो दिला. कारण या देशाला आज भगतसिंगांची साथ, आंबेडकरांची समानता आणि गांधींच्या एकतेची आवश्यकता आहे.

कन्हैया म्हणाला, जो सर्वात मोठा विरोधी पक्ष आहे, तो वाचवता आला नाही, तर देशही वाचणार नाही. जर मोठे जहाज वाचले नाही, तर लहान बोटीही वाचणार नाहीत. मी जिथे जन्मलो, ज्या पक्षात मोठा झालो, त्याने मला शिकवले, लढण्याची हिम्मत दिली. मी त्या पक्षा सोबतच, अशा लाखो आणि कोट्यवधी लोकांचेही आभार मानतो, जे कुठल्याही पक्षाचे नव्हते, पण कुण्या पक्षाकडून आमच्यावर अनावश्यक आरोप झाल्यानंतर, ते आमच्यासाठी व्हॉट्सअॅपवर लढत होते. या देशाला केवळ काँग्रेसच नेतृत्व देऊ शकते.

...म्हणून आज काँग्रेससोबत उभा आहे - जिग्नेश मेवाणी गुजरातमधून आमदार असलेले जिग्नेश मेवाणी म्हणाले, जी कहाणी गुजरातमधून सुरू झाली, तिने गेल्या 6-7 वर्षांत जे काही केले, ते आपल्या सर्वांच्या समोर आहे. आपल्या संविधानावर हल्ला आहे. आपल्या आइडिया ऑफ इंडियावर हल्ला आहे. लोकशाहीवर हल्ला आहे. आज भाऊ-भाऊ एकमेकांचे शत्रू होतील, असा द्वेश कारस्थान करून नागपूर आणि दिल्ली पसरवत आहे.  काहीही करून या देशाचे संविधान, लोकशाही आणि आयडिया ऑफ इंडियाला वाचवायचे आहे. यासाठी ज्यांनी इंग्रजांना देशातून हकलवून दाखवले, त्याच्या सोबत मला उभे राहायचे आहे. म्हणून मी आज काँग्रेससोबत उभा आहे.

 

टॅग्स :kanhaiya kumarकन्हैय्या कुमारJignesh Mevaniजिग्नेश मेवानीcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपा