नवी दिल्ली - जेएनयूच्या विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष आणि सीपीआय नेता कन्हैया कुमार हा भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कट्टर विरोधक आहे. मोदी आणि भाजपाच्या विविध धोरणांवर त्याच्याकडून सातत्याने टीका करण्यात येत असते. मात्र मोदींचा विरोधक असलेल्या कन्हैया कुमारने काही गोष्टींसाठी मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केलं आहे.लल्लनटॉपला दिलेल्या व्हिडिओ मुलाखतीमध्ये कन्हैया कुमारने पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबतचे आपले विचार मांडले आहेत. त्यात तो म्हणाला की, मी अंधभक्त नाही आणि अंधविरोधकही नाही. मी पीएचडी केली आहे आणि एक अभ्यासक म्हणून कुठल्याही बाबतीत तटस्थपणे उणिवा पाहतानाच त्यामधील चांगल्या गोष्टींचाही विचार केला पाहिजे.अन्य महत्त्वाच्या बातम्या - "अटल टनेल युद्धात निरुपयोगी ठरेल, चिनी सैन्य काही मिनिटांतच नष्ट करेल" चीनची भारताला धमकीया मुलाखतीत कन्हैयाने सांगितले की, नरेंद्र मोदींकडे जो अनुभव आहे. तो जमिनीवरील आहे. अशा व्यक्तीला हटवणे खूप कठीण आहे. मोदींचा राजकीय अनुभव हीच त्यांची शक्ती आहे. गरीब कुटुंबातील व्यक्ती पंतप्रधान बनू शकत नाही, हे मिथक नरेंद्र मोदींनी तोडले आहे. गरीब कुटुंबातील व्यक्ती आपल्या मेहनतीच्या जोरावर पंतप्रधान बनू शकते, हे त्यांनी सिद्ध केले आहे.मोदींनी केवळ सत्ता मिळवली नाही तर ती कायम राखली आहे. त्यांचे हे वैशिष्ट्य त्यांना वेगळे बनवते. मोदींच्या योजनांची नावेही वैशिष्ट्यपूर्ण असतात. कोण म्हणणार की मुलीला वाचवून शिकवले नाही पाहिजे. कोण म्हणेल की डिजिटल इंडिया झाला नाही पाहिजे. कोण म्हणेल की शौचालय झाले नाही पाहिजे. अजून एक बाब म्हणजे नरेंद्र मोदी आपल्या विरोधकांचे खुल्या मनाने मूल्यांकन करतात. त्यांच्यातील चांगल्या बाबी स्वीकारतात, ही बाब त्यांना खास बनवते, असे कन्हैया कुमारने सांगितले.दरम्यान, नरेंद्र मोदींच्या चुकीच्या गोष्टींना मी विरोधही करतो. मोदी म्हणतात की मी स्टेशनवर चहा विकला होता. मग जर तुम्ही चहा विकला असेल तर स्टेशन कुठे विकले. जर तुम्ही बेटी बचाओ म्हणता मह कुलदीप सेंगरसारखे लोक तुमच्याकडे काय करताहेत, असा सवालही कन्हैया कुमारने विचारला आहे.