ऑलनाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३ - मागील महिन्यात देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक झालेला जेएनयू मधील विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैयाकुमारने आज नरेंद्र मोदी सरकार वर हल्लाबोल केला. देशविरोधी घोषणाबाजी प्रकरणी जामिनावर सुटलेल्या कन्हैयाकुमारने विद्यार्थांसमोर भाषण करतना थेट भाजपा सरकारसह पंतप्रधान नरेंद्र मोदी, आरएसएस तसेच एबीव्हीपी वर हल्लाबेल केला. बुधवारी झालेल्या सुनावणीत दिल्ली उच्च न्यायालयाने कन्हैयाला सहा महिन्यांसाठी सर्शत हंगामी जामिन मंजूर केला होता. कन्हैयाकुमारने आपल्या भाषणाची सुरवात भारत माता की जय चा नारा लागवत केली.
कन्हैयाकुमारच्या भाषणातील ठळक मुद्दे -
- बनावट ट्विट करणाऱ्यापासून आम्हाला स्वातंत्र्य हवे आहे.
- ABVP वाले नकली इन्कलाब जिंदाबादचे नारे देतात. ABVP ने जेएनयूतील पराभव आठवावा
- आम्ही ABVP ला शत्रू मानत नाही, विरोधक मानतो
- मी ABVP ची शिकार करणार नाही, कारण शिकार त्यांचीचे केली जाते, जे शिकारीसाठी लायक आहेत
- भाजपने कारस्थान करून आपल्याला तुरुंगात टाकलं आहे.
- आई म्हणाली, मोदीजी 'मन की बात' करतात, पण कधीतरी 'माँ की बात' भी कर लेते'
- जे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे त्यावर मी बोलणार नाही
- जेएनयूविरोधात जीही सत्ता उभी राहिली त्याला आम्ही धडा शिकवला आहे.
- लढणारे जबादार नाही लढवणारे जबाबदार आहेत. जेएनयू वरील हल्ला हा पुर्वनियोजित
- या देशातील सरकार हे लोकविरेधी सरकार आहे.
- आम्हाला भ्रष्टाचारपासून स्वातंत्र्य हवंय. शेतकऱ्यांच्या आत्महत्येस कोण जबाबदार आहे.
- तुरुंगात मला पोलीस विचारत होते लाल सलाम च्या घोषणा का देत होतास, लाल सलाम म्हणजे इंक्लाब जिंदाबाद
- मीडियाचे जे लोक जेएनयू साठी बोलत आहेत,ते जेएनयूसाठी नाही तर योग्यला योग्य आणि चूकला चूक बोलत आहेत.