नवी दिल्ली : नऊ फेब्रुवारी रोजी विद्यापीठ परिसरात आयोजित एका वादग्रस्त कार्यक्रमाप्रकरणी दिल्ली विद्यापीठाने केलेल्या दंडात्मक कारवाईच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांच्या दोन गटांनी सुरू केलेल्या बेमुदत उपोषणाचा आज सातवा दिवस असून, विद्यार्थ्यांचे उपोषण बेकायदेशीर असल्याचे कुलगुरू जगदेश कुमार यांनी म्हटले आहे. कन्हैया कुमारचा मंगळवारी रक्तदाब कमी झाला होता. वजन घटल्याने त्याची तब्येत खालावली आहे, असे जेएनयू विद्यार्थी संघटनेने म्हटले आहे.अफजल गुरूबाबतच्या कार्यक्रमासंदर्भात तक्रार करणारा अभाविपचा सौरव शर्माला ग्लुकोज कमी झाल्याने अ. भा. आयुर्विज्ञान संस्थेच्या इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी विधायक मार्गाने मागण्या मांडाव्यात. उपोषण थांबवून चर्चेसाठी यावे, असे आवाहनही कुलगुरूंनी केले आहे.
कन्हैयाची तब्येत उपोषणाने खालावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2016 3:51 AM