नवी दिल्ली/ बल्लारी(कर्नाटक): देशातील वाढती असहिष्णुता आणि या मुद्यावर सरकारने स्वीकारलेली निष्क्रियता याचा निषेध करीत मंगळवारी कर्नाटकचे सुप्रसिद्ध साहित्यिक रहमत तरीकेरी यांनीही आपला साहित्य अकादमी पुरस्कार परत करण्याचा निर्णय जाहीर केला. पाठोपाठ पंजाबच्या नामवंत लेखिका दलीप कौर टिवाणा यांनीही आपला पद्मश्री किताब परत करण्याची घोषणा केली. रहमन तरीकेरी यांनी पुरोगामी विचारवंत एम.एम. कलबुर्गी, नरेंद्र दाभोलकर व गोविंद पानसरे यांच्या हत्येचा निषेध करीत अकादमी पुरस्कार परत करीत असल्याचे जाहीर केले. आतापर्यंत सहा कन्नड लेखकांनी आपले अकादमी पुरस्कार परत करण्याची घोषणा केली आहे. एकापाठोपाठ एक अनेक साहित्यिक आपला साहित्य अकादमी पुरस्कार परत करत असताना केंद्र सरकारने याबाबत अंगिकारलेले उदासीन धोरण इतिहासातील काळा अध्याय आहे, असे द्रमुक प्रमुख एम. करुणानिधी चेन्नई येथे म्हणाले. याउलट संगीत नाट्य अकादमीचे अध्यक्ष शेखर सेन म्हणाले, साहित्यिकांचा राग मी समजू शकतो. कारण प्रतिक्रिया हे रचनात्मकतेचे लक्षण आहे. मात्र गैरसमजातून निर्माण झालेली प्रतिक्रिया गैर आहे. हा तोडगा असूच शकत नाही.महेश शर्मा यांचे घूमजावसाहित्य अकादमी पुरस्कार परत करणाऱ्या साहित्यिकांविरोधात वादग्रस्त विधान करणारे केंद्रीय सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा यांनी मंगळवारी घूमजाव केले.
कन्नड लेखकाने परत केला पुरस्कार
By admin | Published: October 14, 2015 12:52 AM