शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

बकऱ्याच्या जागी कुत्रा ठेवला; भुंकल्यानंतर व्यापाऱ्याचे डोळे उघडले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2018 4:15 PM

कानपूर : उत्तर प्रदेशमध्ये एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. एका बकरा विक्रेत्याला आपल्याकडील कुत्रा देऊन त्या बदल्यात खराखुरा बकरा नेल्याचा प्रकार नुकताच घडला. मात्र, काही वेळाने कुत्र्याने आपले खरे रुप दाखविल्याने व्यापाऱ्याला आपण फसले गेल्याचे समजले. यानंतर व्यापाऱ्याने थेट पोलिस ठाणे गाठले.कानपुरच्या जाजमऊ मंडईमध्ये अशरफ हा व्यापारी काही ...

कानपूर : उत्तर प्रदेशमध्ये एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. एका बकरा विक्रेत्याला आपल्याकडील कुत्रा देऊन त्या बदल्यात खराखुरा बकरा नेल्याचा प्रकार नुकताच घडला. मात्र, काही वेळाने कुत्र्याने आपले खरे रुप दाखविल्याने व्यापाऱ्याला आपण फसले गेल्याचे समजले. यानंतर व्यापाऱ्याने थेट पोलिस ठाणे गाठले.

कानपुरच्या जाजमऊ मंडईमध्ये अशरफ हा व्यापारी काही बकरे घेऊन विक्रीसाठी आला होता. हा परिसर गर्दीचा असल्याने याचा फायदा उठवत एका भामट्याने अशरफच्या हातातील एका बकऱ्याची दोरी आपल्या हातात घेतली व काही वेळात पुन्हा अशरफच्या हातात परत दिली. 

गर्दी असल्याने अशरफने फारसे लक्ष दिले नाही. मात्र, काहीवेळाने मागुन भुंकण्याचा आवाज आल्याने अशरफने पाठीमागे पाहिले तर काय त्याच्याकडील बकऱ्याऐवजी कुत्रा बांधलेला दिसला. अशरफला ही बाब समजेपर्यंत भामट्याने तेथून बकरा घेऊन पळ काढला होता. यानंतर अशरफ याने पोलिसांना याबाबतची माहिती दिली.  

पोलिसांनी सांगितले की, आम्हाला या कथित घटनेची माहिती मिळाली. पोलीस सांगितलेल्या ठिकाणी जाऊनही आले. मात्र, तो विक्रेता त्या ठिकाणी सापडला नाही. कोणीतरी गंमत केल्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Bakri Eidबकरी ईदBakri Idबकरी ईदUttar Pradeshउत्तर प्रदेशCrimeगुन्हा