कानपूर – हिंदू ते मुस्लीम बनलेल्या मूक बधिर आदित्यच्या आईवडिलांसमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे. आदित्य त्याच्या घरी परतला आहे परंतु मौलानाने आदित्यचं माइंड वॉश अशाप्रकारे केले आहे ज्यामुळे तो समोरच्याच ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाही. तो त्याच्या आईवडिलांना हिंदू धर्मापेक्षा मुस्लीम धर्म किती श्रेष्ठ आहे हाच तर्क लावत आहेत.
आदित्यची आई ज्योती सांगते की, मौलानाने माझ्या मुलाच्या डोक्यात हिंदूंविरोधात इतका द्वेष निर्माण केला आहे जो सहजपणे काढणं कठीण आहे. इतकचं नाही तर जगातील सर्वात जुना धर्म सनातन नव्हे तर इस्लाम आहे असं त्याने मुलाला सांगितले आहे. आदित्यनं घरात ७ प्रश्न विचारले आहेत त्याचं उत्तर आईवडिलांना देणं कठीण होत आहे.
‘या’ ७ प्रश्नांची उत्तरं आदित्यला हवीत
- हिंदू धर्मात सर्व देवीदेवतांची पूजा केली जाते परंतु इस्लाममध्ये केवळ अल्लाह आहे?
- सर्वात जुना धर्म हिंदू नाही तर इस्लाम आहे?
- हिंदू धार्मिक पुस्तकात आणि ग्रंथांत नियम स्पष्ट नाही. परंतु कुरानमध्ये सर्व काही काचेसारखं स्वच्छ आहे?
- हिंदू धर्मात मांसाहर वर्ज्य का आहे? तर अल्लाह मांसाहार चांगलं मानतो?
- हिंदू धर्मात एकाच लग्नाला परवानगी का आहे? तर इस्लाममध्ये अल्लाहने अनेक लग्नाला परवानगी दिलीय?
- हिंदू धर्मात मृतदेह जाळला का जातो? मृतदेह दफन करणं योग्य मानलं जातं ते इस्लाममध्ये होते कारण कोणतंही भय नसावं?
- हिंदू धर्मात स्त्री आणि पुरुषाचं राहणीमान चुकीचं आहे? तर इस्लाममध्ये महिला आणि पुरूषांचं राहणीमान योग्य आणि आदरपूर्ण आहे?
आदित्यच्या प्रश्नांना आचार्य मोहित पांडेय यांनी उत्तरं
- प्रत्येक धर्मात देवीदेवतांची पूजा आपापल्या पद्धतीने केली जाते. यात कोणताही धर्म छोटा-मोठा किंवा चांगला वाईट नसतो. पूजा पद्धतीवर धार्मिक स्वरूपाच्या आधारावर होते.
- हा आस्थेचा निगडीत प्रश्न आहे. प्रत्येक धार्मिक व्यक्ती स्वत:च्या धर्माला सर्वात जुना मानतो. धर्माची वर्तमान स्थिती काय आहे हे जास्त महत्त्वाचं ठरतं.
- हिंदू धर्माला एक विराट स्वरुप आहे. नियम त्याच्या मानण्यानुसार असतात जो ज्या धर्माला मानतो त्याच्यासाठी तोच धर्म मोठा असतो. तोच धर्म स्वच्छ असतो.
- हिंदू धर्मात शाकाहार सर्वोपरी मानलं जातं परंतु खाणे-पिणे ही धर्मची ओळख होऊ शकत नाही. हा विषय प्रत्येकाच्या खासगी आयुष्याशी निगडीत आहे.
- हिंदू धर्मात लग्नाला सर्वोश्रेष्ठ दर्जा दिला आहे. परंतु त्यावर निर्बंध नाहीत. हा धर्माचा विषय होऊ शकत नाही. हा माणसाचा वैयक्तिक प्रश्न आहे. अल्लाहने हे कुठे सांगितले आहे की जितकी मर्जी असेल तितकी लग्न करा?
- हिंदू धर्मात मृतदेहाचं दहन करण्यामागे अनेक तर्क आहेत. सर्वात मोठा तर्क म्हणजे मोक्ष प्राप्ती, या प्रश्नाला ईश्वर आणि अल्लाहशी जोडणं चुकीचं आहे. कारण हिंदू धर्मात अनेक जाती आहेत जे मृतदेहाला जाळण्याऐवजी दफन करतात.
- राहणीमान हे धार्मिक ओळखीपेक्षा जास्त वैयक्तिक प्रत्येकाच्या स्वतंत्र्याचा विषय आहे. धर्माला जोडून चांगले वाईट ठरवणे चुकीचे आहे. जर असं असेल तर मुस्लीम युवक जीन्स, टीशर्ट का घालतात? सर्वांचं राहणीमान धर्माच्या आधारे का होत नाही?
मौलानाने व्हिडीओ दाखवून माइंड वॉश केलं
ज्योती म्हणाल्या की, मौलानाने मूकबधिर विद्यार्थ्यांना टार्गेट करण्यासाठी अनेक व्हिडीओ दाखवून त्यांचे माइंड वॉश केले आहे. मौलानाने इस्लामशी निगडीत अनेक व्हिडिओ तयार केले होते. त्यात इस्लाम धर्म सर्वात श्रेष्ठ आहे. तर हिंदू आणि इतर धर्माबद्दल वाईट सांगितले होते. हा व्हिडीओ वारंवार मुलांना दाखवण्यात आला. हिंदूमध्ये अशाप्रकारे व्हिडीओ बनवले जात नाहीत. त्यामुळे आदित्यला समजावणं कठीण होत आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
आदित्यच्या घरातले सांगतात की, २०१५ मध्ये आदित्य मूक बधिर विद्यालयात शिक्षण घेत होता. तेव्हा सर्व धर्माची माहिती घेण्यासाठी शाळेतर्फे त्यांना हलीम मुस्लीम कॉलेजमध्ये आठवड्यातून एकदा क्लाससाठी पाठवलं जात होते. जिथे त्याची ओळख मोहम्मद वासिफ यांच्याशी झाली. त्यानंतर तो सतत वासिफ यांच्या संपर्कात राहिला. १० मार्च २०२१ रोजी घरातल्यांसोबत लपवून त्याने वासिफ यांच्या टीममध्ये सहभाग घेतला. या ७ वर्षाच्या काळात वासिफ आणि इतर मौलानांनी आदित्यच्या मनात हिंदू धर्माबद्दल द्वेष भरला आणि इस्लाम धर्माबद्दल आपुलकी निर्माण केली. याच दरम्यान आदित्यचं धर्म परिवर्तन करून त्याला अब्दुल बनवलं गेले.