शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

रोटोमॅक पेन आठवतोय? चार कंपन्यांचा एकच कर्मचारी, तोच सीईओ; मोठा घोटाळा उघड

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2022 2:56 PM

चार कंपन्यांसोबत 26,000 कोटींचा व्यवसाय, बँकांनी दिले 2100 कोटींचे कर्ज; CBIने उघडकीस आणला मोठा घोटाळा.

कानपूर: सीबीआयने (CBI) कानपूरमध्ये एक मोठा घोटाळा उघडकीस आणला आहे. रोटोमॅक कंपनीने चार कंपन्यांसोबत 26000 कोटींचा व्यवसाय केला, विशेष बाब म्हणजे या चारही कंपन्यांचा पत्ता एकच असून, त्यात कर्मचारीही एकच आहेत. एक कर्मचारी असलेल्या कंपन्यांसोबत व्यवसाय करुन रोटोमॅकने बँकांकडून 2100 कोटी रुपयांचे कर्ज कसे मिळवले, याचा तपास सीबीआय करत आहे.

चार कंपन्या एक कर्मचारीरोटोमॅकने फक्त चार कंपन्यांसोबत 26143 कोटी रुपयांचा व्यवसाय केल्याचे तपासात समोर आले आहे. या कंपन्यांचा पत्ताही एकच असून, तो पत्ता म्हणजे 1500 स्क्वेअर फुटांचा एक हॉल आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या चारही कंपन्यांमध्ये एकच कर्मचारी काम करतो. तोच कंपनीचा सीईओदेखील आहे. या कंपन्यांसोबत कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय सुरू असल्याच्या आधारे बँकांनी रोटोमॅकला 2100 कोटी रुपयांचे कर्जही दिले होते.

PNB बँकेची पोलिसांत तक्रारसीबीआयचा आरोप आहे की, संचालक विक्रम कोठारी(मृत्यू झाला) आणि राहुल कोठारी यांनी इतरांसह मिळून, बँलेंसशीटमध्ये फेरफार केली आणि बँकांकडून कर्ज घेतले. पंजाब नॅशनल बँकेच्या तक्रारीवरून सीबीआयने रोटोमॅक ग्लोबलचे संचालक राहुल कोठारी, साधना कोठारी आणि अज्ञात अधिकाऱ्यांविरुद्ध 93 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा नवा गुन्हा दाखल केला आहे.

आपलाच माल खरेदी करायची कंपनीसीबीआयच्या म्हणण्यानुसार, रोटोमॅक ग्रुपसोबत व्यवसाय करणाऱ्या चार कंपन्या रोटोमॅकचे सीईओ राजीव कामदार यांचा भाऊ प्रेमल प्रफुल कामदार यांच्या मालकीच्या आहेत. रोटोमॅकने या चार कंपन्यांना कागदावरच उत्पादने निर्यात केली. या सर्व कंपन्या बंज ग्रुपकडून रोटोमॅकला माल विकत होत्या, म्हणजेच माल बनवणारी कंपनीच आपला माल खरेदी करत होती.

या चार कंपन्यांच्या नावे व्यवसाय

मॅग्नम मल्टी-ट्रेड, ट्रायम्फ इंटरनॅशनल, पॅसिफिक युनिव्हर्सल जनरल ट्रेडिंग आणि पॅसिफिक ग्लोबल रिसोर्सेस प्रायव्हेट लिमिटेड अशी या चार कंपन्यांची नावे आहेत. विशेष म्हणजे 26000 कोटींचा व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांचे 1500 स्क्वेअर फूटमध्ये एकच कार्यालय होते. पीएनबीच्या तक्रारीवरून मंगळवारी एक नवीन एफआयआर नोंदवण्यात आला. उत्पादक कंपनीच आपला माल खरेदी करायची, अशी माहिती तबासात समोर आली.

एका कर्मचाऱ्याने व्यवसाय सांभाळला26 हजार कोटींचा व्यवसाय दाखवणाऱ्या चार कंपन्यांमध्ये एकच कर्मचारी असल्याचे सीबीआयच्या तपासात उघड झाले असून, त्याचे नाव प्रेमल प्रफुल्ल कामदार आहे. 1500 स्क्वेअर फुटांच्या खोलीत बसून तो लोडिंग, अनलोडिंगपर्यंतची सर्व कामे करत होता. अशा कंपनीकडून व्यवसायाच्या आधारे बँकांनी 2100 कोटी रुपयांचे कर्ज दिलेच कसे? असा प्रश्न सीबीआयला पडला. त्यामुळेच बँक अधिकारीदेखील  संशयाच्या भोवऱ्यात आहेत.

टॅग्स :CBIगुन्हा अन्वेषण विभागkanpur-urban-pcकानपूर शहरीUttar Pradeshउत्तर प्रदेश