शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची तब्येत बिघडली; AIIMS रुग्णालयात केले दाखल
2
“निरोप द्यायला सभागृहात यायला हवे ना, फेसबुक लाइव्ह करुन...”; शिंदेंचे ठाकरेंना प्रत्युत्तर
3
“सर्वांत जास्त पेपरफूट ही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना झाली”; देवेंद्र फडणवीसांची टीका
4
जम्मू-काश्मीरच्या डोडामध्ये भीषण चकमक; 3 पाकिस्तानी दहशतवाद्यी ठार
5
“मी तुमचाच, विरोधी पक्षनेते हे केवळ पद नाही तर...”; राहुल गांधींची प्रतिक्रिया, दिली गॅरंटी
6
पाकिस्तानच्या आरोपांपासून ते ऑस्ट्रेलिया स्पर्धेबाहेर होण्याच्या प्रश्नावर Rohit Sharmaची भन्नाट बॅटिंग
7
सेमी फायनलपूर्वी राशिद खानवर ICC ची कारवाई; बांगलादेशविरुद्धच्या लढतीतील चूक भोवली
8
काँग्रेस नेते सॅम पित्रोदा परतले; पुन्हा इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड
9
"ब्रँड हा ब्रँड असतो! राष्ट्रवादी या ब्रँडला कॉपी करण्याची..."; शरद पवार गटाने सुनिल तटकरेंना डिवचलं
10
मोठी बातमी : भारतीय संघात अचानक करावा लागला बदल, शिवम दुबे... 
11
'बैलगाडीतून जाईन पण Air India मध्ये पुन्हा बसणार नाही', प्रवाशाचा संताप; नेमकं काय झालं?
12
देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली? नवनीत राणांनी सविस्तर सांगितले
13
“महाघोटाळेबाज सरकारचा चहा घेणे जनतेचा अपमान, शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्या”: विजय वडेट्टीवार
14
“महायुती पक्की, राज्यात पुन्हा डबन इंजिनचे सरकार येईल”; चंद्रशेखर बावनकुळेंना विश्वास
15
₹23 रुपयांचा शेअर सुटलाय सुसाट, आली 'तुफान' तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुबंड, 220% नं वधारला
16
“विधानसभेला महायुतीत अजितदादांच्या वाट्याला २० ते २२ जागा येतील”; रोहित पवारांचा टोला
17
"तुरुंगातून बाहेर येऊ नये यासाठी संपूर्ण यंत्रणा प्रयत्नात"; सीएम केजरीवाल यांच्या अटकेवर पत्नी सुनीता केजरीवाल म्हणाल्या,...
18
ईव्ही क्षेत्रातली बडी कंपनी महाराष्ट्रात येणार; 4000 लोकांना रोजगार मिळणार; फडणवीसांची घोषणा
19
विरोधी पक्षनेते झालेले किती नेते पुढे पंतप्रधानपदापर्यंत पोहोचले? पाहा...
20
गळाभेट, हातात-हात अन्...; संसद भवनात दिसली चिराग-कंगनाची जबरदस्त केमिस्ट्री! बघा VIDEO

Kanpur Violence: कानपूरमध्ये दोन समाजात हिंसाचार; नमाजानंतर दगडफेक आणि तोडफोड, पोलिसांचा हवेत गोळीबार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2022 6:25 PM

Kanpur Violence : उत्तर प्रदेशातील कानपूरच्या बेकनगंज भागात शुक्रवारच्या नमाजानंतर दोन समाजात मोठा हिंसाचार झाला. यात अनेकजण जखमी झाले असून, पोलिसांनी परिसर सील केला आहे.

कानपूर: गेल्या काही दिवसात देशातील विविध भागात हिंदू-मुस्लिम हिंसाचाराच्या घटना वाढल्या आहेत. आजही उत्तर प्रदेशातील कानपूरच्या बेकनगंज भागात शुक्रवारच्या नमाजानंतर दोन समाजात मोठा गोंधळ उडाला. यतिमखाना चौकीजवळील बाजार बंद करण्यासाठी दोन समाजातील लोक समोरासमोर आल्याने दगडफेक सुरू झाली. गदारोळ आटोक्यात आणण्यासाठी आलेल्या पोलिसांवरही प्रचंड दगडफेक केली.

कानपूरमध्ये नमाजानंतर झालेल्या हिंसक चकमकीत अनेकजण जखमी झाले आहेत. मोहम्मद पैगंबरावर केलेल्या वक्तव्यामुळे हा राडा झाल्याचे बोलले जात आहे. नमाजानंतर आंदोलन केले जाऊ नये, यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त केला होता. मात्र एक हजारांपेक्षा जास्त लोक रस्त्यावर आले, त्यानंतर अचानक दगडफेक सुरू झाली. संशयाच्या आधारे पोलिसांनी 18 हल्लेखोरांना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांचा लाठीचार्ज भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी एका टीव्ही चॅनलवरील चर्चेदरम्यान पैगंबर मोहम्मद साहब यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. त्यामुळे मुस्लिम समाजात नाराजी पसरली होती. या संदर्भात मुस्लिम संघटनांनीही बाजार बंदची हाक दिली. लोकांना नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला. तसेच, लाठीचार्ज करुन लोकांना पांगवण्यात आले. तरीही लोक अधूनमधून दगडफेक करत होते. 

DGP आणि ADG LO यांना फोर्स पाठवण्याचे निर्देशया प्रकरणादरम्यान पोलिसांनी संपूर्ण परिसराची नाकेबंदी केली आहे. कानपूरमध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सुमारे 12 पोलिस ठाण्यांचा फौजफाटा घटनास्थळी पाठवण्यात आला आहे. या दगडफेकीत सुमारे 7 जण जखमी झाले.यूपी सरकारने डीजीपी आणि एडीजी एलओ यांना सूचना दिल्या आहेत. त्यानंतर 2 कंपनी PAC आणि 1 प्लाटून कानपूरला पाठवण्यात येत आहे. यासोबतच कानपूरमधील वातावरण हाताळण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही पाठवण्यात येत आहे.

कानपूर बाजार बंदजोहर फॅन्स असोसिएशन आणि इतर मुस्लिम संघटनांनी शुक्रवारी मुस्लिम समाजाला व्यवसाय बंद ठेवण्याचे आवाहन केले. चमनगंज, बेगनगंज, तलाक महल, कर्नलगंज, हिरामण पूर्वा, दलेल पूर्वा, मेस्टन रोड, बाबू पूर्वा, रावतपूर आणि जाजमाऊ या भागात शुक्रवारी सकाळपासूनच बाजारपेठा अंशतः किंवा पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्या. या गोंधळानंतर कानपूरच्या उर्वरित बाजारपेठांमध्येही शांतता पसरली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील इतर बाजारपेठांमध्येही पोलिसांची गस्त वाढवण्यात आली आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशKanpur Policeकानपूर पोलीस