उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सरकारी नोकरी लागताच पत्नी बदलली. तिने तिच्या पतीसोबत राहण्यासाठी १ कोटी रुपये देण्याची अट ठेवली. यामुळे पतीला मोठा धक्का बसला. त्यांनी कानपूर पोलिसांकडे या प्रकरणाची तक्रार दाखल केली. पत्नी दिल्लीमध्ये सरकारी शिक्षिका झाल्याचं पतीने तक्रारीत म्हटलं आहे. आता ती एकत्र राहण्यासाठी १ कोटी रुपये मागत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पतीने या प्रकरणाची तक्रार कानपूर पोलिसांकडे केली आहे. पत्नी तिच्या वडिलांकडे गेली आहे, असं तक्रारीत म्हटलं आहे. तिला सरकारी नोकरी मिळाली आहे. आता ती एकत्र राहण्यासाठी १ कोटी रुपये रोख मागत आहे. कानपूरमधील शाळा संचालकाने त्याची पत्नी आणि इतर सासरच्या लोकांविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
दिल्लीतील एका तरुणीशी लग्न झालं होतं. ती त्याच्यासोबत कानपूरमध्ये राहत होती. या काळात तिला सरकारी नोकरी मिळाली आणि ती काम करण्यासाठी दिल्लीला गेली. सरकारी नोकरी मिळाल्यानंतर पत्नीने एक अट घातली आहे की सोबत राहण्यासाठी १ कोटी रुपये रोख द्यावे लागतील. पत्नी अशी धमकीही देत आहेत की, जर तू जास्त दबाव आणलास तर हुंडा प्रकरणात अडकवेन.
पतीने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे की, त्याचे सासरे आणि मेहुणे पत्नीसह आपल्या घरी आले आणि त्यांनी त्याला मारहाण केली. त्यानंतर ती दिल्लीला गेली आणि म्हणाली की, जर तुला माझ्यासोबत राहायचं असेल तर एक कोटी रुपये द्यावे लागतील. या प्रकरणात, नौबस्ता पोलिस स्टेशनचे प्रभारी संतोष कुमार सिंह म्हणतात की, महिलेच्या पतीने तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे, त्यानुसार कारवाई केली जाईल.