नवी दिल्ली - जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत आहे. देश कोरोनाचा सामना करण्यासाठी सज्ज झालेला असतानाच केंद्रातील नरेंद्र मोदीसरकारच्या दुसर्या कार्यकाळाला एक वर्ष पूर्ण झाले आहे. मात्र सरकार आपली वर्षपूर्ती साजरे करत नाही. याबाबत सोशल मीडियावर मोहीम सुरू आहे. याच दरम्यान काँग्रेसने मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे.
कपिल सिब्बल यांनी 6 वर्षांत बदल झाला आहे. मात्र मूडीने जीडीपी रँकिंग खाली घसरल्याचे दाखवले आहे, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी कुठे आहेत? असा सवाल उपस्थित केला आहे. सिब्बल यांनी ट्विटरवरून मोदींवर हल्लाबोल केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी अनेक मुद्दे उपस्थित केले आहेत. लव्ह जिहाद, घर वापसी, सर्जिकल स्ट्राइक, ट्रिपल तलाक, 370 कलम, यूएपीए, सीएए आणि एनआरसी हे मुद्दे उपस्थित केले आहेत. हे मुद्दे वादग्रस्त असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
सिब्बल यांनी देशाचे प्रश्न उपस्थित केले आहेत. यात त्यांनी आरोग्य, शिक्षण, बेरोजगारी, गरिबी, मध्यमवर्गाचे प्रश्न आणि आर्थिक मंदीचा उल्लेख केला आहे. हा उल्लेख करताना त्यांनी पंतप्रधान मोदी कोठे आहेत, असा सवाल उपस्थित केला आहे. मोदी सरकारच्या दुसर्या कार्यकालातील पहिले वर्ष पूर्ण झाल्यावर सरकारकडून आपल्या कामगिरीबाबत माहिती दिली जात आहे. त्यापैकी जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटविणे, नागरिकता दुरुस्ती कायदा, तिहेरी तालक विधेयक, राम मंदिराचे बांधकाम सुरू करणे आणि आणखी काही मुद्दे उपस्थित केले जात आहेत. तर दुसरीकडे काँग्रेस सातत्याने आर्थिक आघाडीवर अपयशी ठरल्याबद्दल सरकारला लक्ष्य करत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : लय भारी! कपडे असो वा वस्तू 'या' भन्नाट उपकरणाच्या मदतीने होणार व्हायरसमुक्त
CoronaVirus News : कोरोनाचा धसका! आपलेही झाले परके... रस्त्यावर सोडून दिला मृतदेह
CoronaVirus News : कोरोना योद्ध्यांसाठी 'ही' औषधी ढाल फायदेशीर ठरणार, व्हायरसपासून रक्षण होणार