Kapil Sibal: कपिल सिब्बल आहेत अब्जावधींच्या संपत्तीचे धनी, कारचे शौकीन, एवढी आहे एकूण मालमत्ता
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2022 06:21 PM2022-05-25T18:21:55+5:302022-05-25T18:37:41+5:30
Kapil Sibal News: ज्येष्ठ विधिज्ञ आणि राजकारणी कपिल सिब्बल यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत समाजवादी पक्षामध्ये प्रवेश केला आहे. त्यांना सपाने राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. देशाचे माजी कायदेमंत्री असलेले कपिल सिब्बल हे कारचे शौकीन आहेत. तसेच अब्जावधीच्या संपत्तीचे मालक आहेत.
नवी दिल्ली - ज्येष्ठ विधिज्ञ आणि राजकारणीकपिल सिब्बल यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत समाजवादी पक्षामध्ये प्रवेश केला आहे. त्यांना सपाने राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. देशाचे माजी कायदेमंत्री असलेले कपिल सिब्बल हे कारचे शौकीन आहेत. तसेच अब्जावधीच्या संपत्तीचे मालक आहेत. त्यांच्याकडे किती कार आहेत. त्यांच्याकडे कुठल्या कुठल्या कारचं कलेक्शन आहे आणि त्यांची एकूण किती संपत्ती आहे, याचा आढावा पुढीलप्रमाणे.
२०१६ मध्ये राज्यसभा निवडणुकीत दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार कपिल सिब्बल यांच्याकडे एकीण ८९.४८ लाख रुपयांच्या गाड्या आहेत. यामध्ये १९९५ मधील एक सुझुकी जीप, २००१ मधील ह्युंडाई सोनाटा, २००३ मधील टोयोटा, २०१२ मधील मारुती डिझायर आणि २०१५ मधील मर्सिडिझ जीएलसी आणि २०१६ मधील टोयोटा Camry यांचा समावेश आहे. त्याशिवाय त्यांच्याकडे १९९७ मधील रॉयल एन्फिल्ड बुलेट आणि २०१६ मधील हीरो स्पेंडर यांचा समावेश आहे.
याशिवाय कपिल सिब्बल यांच्याकडे देशातील विविध शहरांमध्ये कोट्यवधीची मालमत्ता आहे. लुधियाना, चंडीगड, दिल्ली, बंगळुरू या शहरांमध्ये त्यांच्याकडे ३.६५ कोटी रुपयांची कमर्शियल मालमत्ता आहे. तर सिकंदराबाद, पाटणा, दिल्ली, चंडीगड, गुरुग्राम आणि हैदराबाद येथे ९९.५९ कोटी रुपयांची रहिवासी मालमत्ता आहे.
तसेच कपिल सिब्बल यांनी शेअर बाजारात १० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. कपिल सिब्बल हे १०० कोटी रुपयांहून अधिकची मालमत्ता असलेल्या मोजक्या नेत्यांपैकी एक आहेत. २०१६ मधील प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे एकूण २१२ कोटी रुपयांची संपत्ती आहे. पैकी १४ कोटी रुपये बँकेत आहेत. तर त्यांच्याकडे ३ लाख रुपये रोख रक्कम आहे.