नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून देशभरातील अनेकविध न्यायालयांमध्ये कोरोनासह अन्य याचिकांवर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनावणी पार पडत आहे. यातच सामान्य नागरिकांप्रमाणे सर्वोच्च न्यायालयात एका पार पडलेल्या सुनावणीवेळी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये अनेक तांत्रिक अडचणी आल्या. यावर ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत हे दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. (kapil sibal says god save us all after technical glitch disrupt in virtual supreme court hearing)
झाले असे की, खासदार नवनीत राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या जातप्रमाण पत्रासंदर्भातील याचिकेवर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनावणी सुरू होती. सुनावणी सुरु असतानाच न्या. दिनेश महेश्वरी व्हिडीओ कॉलमधून लॉग आऊट झाले. मात्र, पुन्हा त्यांना लॉइन करता येईना. यानंतर ज्येष्ठ वकील कपील सिब्बल, मुकूल रस्तोगी आणि न्या. सारन यांच्यातही चर्चा झाली. मात्र, त्यांनाही तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला.
लस घ्या आणि १० टक्के सूट मिळवा; ‘या’ विमान कंपनीची भन्नाट ऑफर
तर देवच वाचवू शकतो
या सर्व प्रकारावर ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आणि संतप्त स्वरात भूमिका मांडली. सर सर्वोच्च न्यायालयामध्येही संवाद माध्यमे योग्य पद्धतीने काम करत नसतील तर देवच आपल्याला वाचवू शकतो. हे फार दुर्दैवी आहे, असे कपिल सिब्बल म्हणाले. यावेळी न्या. महेश्वरी हे पुन्हा सुनावणीमध्ये सहभागी होण्यासाठी कॉल करण्याचा प्रयत्न करत असतानाच त्यांच्या सहकऱ्यांनी कपील सिब्बल हे माहिती तंत्रज्ञान मंत्री होते अशी आठवण करुन दिली. न्या. सारन यांनी, त्यावेळीही असे व्हायचे का, असा खोचक सवाल केला. यावर, हो आणि मी तिथे असतो तर हे असे कधीच झाले नसते, असे कपिल सिब्बल यांनी सांगितले.
“योगी आदित्यनाथांसोबत होतो, आहे आणि पुढेही राहणार”: केशव प्रसाद मौर्य
दरम्यान, वकील मुकूल रस्तोगी यांनी आपले मत मांडले. सरकारी अधिकाऱ्यांसाठी तयार करण्यात आलेली इंटरनल हॉटलाइनची सेवा अटॉर्नी जनरल असताना अनेकदा अशापद्धतीने बंद पडायची, असे ते म्हणाले. गतवर्षीच्या मार्च महिन्यापासून कोरोना प्रादुर्भावामुळे सर्वोच्च न्यायालयामध्ये ऑनलाइन सुनावणी सुरु आहेत.