कर्नाटक मंत्रिमंडळाचा आज विस्तार, २४ आमदार सिद्धरामय्या सरकारमध्ये मंत्री होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2023 08:17 AM2023-05-27T08:17:00+5:302023-05-27T08:17:43+5:30
आज कर्नाटकातील मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. पक्षाने जाहीर केलेल्या यादीनुसार २४ आमदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार आहे.
कर्नाटकात काँग्रेसने सत्ता स्थापन केली. दरम्यान काही दिवसापासून मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू आहे. पहिल्या शपथविधी सोहळ्यापासूनच याबाबत अनेक अटकळ बांधल्या जात होत्या, मात्र आता मंत्रिमंडळ विस्ताराचे चित्र स्पष्ट झाले असून, आज कोणते आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत, हेही स्पष्ट झाले आहे.
चार राज्यांमध्ये आधी लागू हाेणार समान नागरी कायदा, कोणती? केंद्र आधी इथे प्रयोग करणार
मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटक सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार शनिवारी म्हणजेच २७ मे रोजी होणार आहे. एचके पाटील, रहीम खान, बी सुरेश यांच्यासह २४ नेते सिद्धरामय्या सरकारमध्ये मंत्री होणार आहेत. मंत्र्यांची जारी केलेली यादीही समोर आली असून, त्यानुसार शनिवारीच या मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे.
२४ आमदार शपथ घेणार
आमदार एचके पाटील, कृष्णा बायरे, गौडा एन चेलन स्वामी, के व्यंकटेश, एच महादेवप्पा, ईश्वर खांद्रे, केएन राजन्ना, दिनेश गुंडुराव, शरणा बसप्पा, शिवानंद पाटील, आर बी तिम्मापूर, एस एस मल्लिकार्जुन, शिवराज तंगाडगी, शरण प्रकाश पाटील, मनकलवैद्य, लक्ष्मी हेबाळकर, रहीम खान, डी सुधाकर, संतोष लाड, एन एस बोस राजो, बायार्थी सुरेश, मधु बंगरप्पा, एम सी सुधाकर, बी नागेंद्र.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डिके शिवकुमार यांच्यासह ८ नेत्यांनी २० मे रोजी मंत्रिपदाची शपथ घेतली. आतापर्यंत उपमुख्यमंत्री किंवा मंत्र्यांना खात्यांचे वाटप झालेले नाही. अशा स्थितीत कर्नाटकातून दिल्लीत पोहोचलेले सिद्धरामय्या आणि शिवकुमार काँग्रेस हायकमांडसह मंत्र्यांच्या खात्यांच्या वाटपाची चर्चा करण्यासाठी गेले होते.