उत्तर प्रदेशातील कानपूर येथील करौली आश्रमात एका भक्तासोबत मारहाणीच्या वादात अडकलेल्या बाबा संतोष भदौरिया यांना एका व्यक्तीने ओपन चॅलेंज दिलं आहे. "कोणताही आजार बरा करण्याचा दावा करणाऱ्या बाबांनी डोळे बरे केले तर मी त्यांना ब्लँक चेक देईन" असं म्हटलं आहे. डॉक्टरांसोबत झालेल्या मारहाणीच्या प्रकरणानंतर बाबा एका दिवसात कोणताही आजार बरा करण्यास सक्षम असल्याचा दावा करत होते.
"मी सनातनी आहे, बाबांना आव्हान देतो की..."
कानपूरमधील बाबा करौली शंकर धाममध्ये पोहोचल्यानंतर वकील अनिरुद्ध जैस्वाल यांनी बाबांना आव्हान दिले. ते त्यांच्या ड्रायव्हरसह कोर्टात पोहोचले. अपघातात त्याच्या एका डोळ्याला इजा झाल्याचे चालकाने सांगितले. यावेळी वकिलाने सांगितले की, "जर बाबांनी डोळे बरे केले तर मी त्यांना ब्लँक चेक देईन, पण ते तसे करू शकत नसतील तर बाबांनी खोटे दावे करणे थांबवावे. मी सनातनी आहे. मी बाबांना आव्हान देतो की, माझ्या ड्रायव्हरचे खराब झालेले डोळे बरे करावेत."
करौली बाबा संतोष सिंह भदौरिया यांच्यावर यापूर्वी एका भक्ताने मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला होता. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. बाबा आणि व्यक्तीमध्ये वाद झाल्याचे दिसून येते. बाबांच्या आश्रमात दररोज तीन ते चार हजार भाविकांची गर्दी होत असल्याचे सांगण्यात येत आहे. आश्रमात भाविकांना 100 रुपयांची पावती फाडावी लागते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
करौली आश्रमात 1.5 लाखांचा होम करताच मुलगा बेपत्ता, दुसऱ्या दिवशी वडील गायब
झारखंडमधून उपचारासाठी आलेल्या एका कुटुंबाने करौली आश्रमावरच आता सवाल उपस्थित केला आहे. कुटुंबीय आपल्या लहान मुलावर उपचार करण्यासाठी करौली आश्रमात आले होते, मात्र कुटुंबप्रमुख आणि आजारी मुलगा आश्रमातून बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना घ़डली आहे. झारखंडमधील देवघर येथील एक कुटुंब आपल्या मुलावर उपचार करण्यासाठी 24 जानेवारीला करौली आश्रमात आले होते. हे कुटुंब करौली शंकर महादेवाच्या दरबारात पोहोचले होते. करौली शंकर महादेव यांनी होम-हवन करण्याची सूचना केली होती. दीड लाख रुपयांचा होम करावा, असे आश्रमाच्या वतीने सांगण्यात आले. 25 जानेवारी रोजी कुटुंबाच्या वतीने दीड लाख रुपये खर्च करून होम करण्यात आला.
होम केल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 26 जानेवारीला आजारी मुलगा बेपत्ता झाला. तर त्यानंतर 27 जानेवारी रोजी कुटुंबप्रमुख अचानक गायब झाले. यानंतर कुटुंबीयांच्या वतीने दोघांचा शोध घेण्याचे काम सुरू करण्यात आले. जवळपास 10 दिवसांनंतर आश्रमापासून 150 किलोमीटर अंतरावर असलेल्या गावात एक मानसिकरित्या आजारी मुलगा सापडला. कुटुंबीयांनी त्याला परत आणले, मात्र वडिलांचा ठावठिकाणा लागला नाही. यानंतर कुटुंबीयांनी 9 फेब्रुवारी रोजी कानपूरमधील विधनू पोलीस ठाण्यात व्यक्ती हरवल्याची तक्रार नोंदवली होती. दोन महिने झाले तरी वडील बेपत्ता आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"