मुंबई - कारगील युद्धांच्या आठवणींना आज 19 वर्षे पूर्ण होत आहेत. आजच्याच दिवशी म्हणजे 26 जुलै 1999 साली भारतीय सैन्याने कारगीलमध्ये बर्फाळ जमिनीवर तिरंगा फडकवत पुन्हा एकदा पाकिस्तानला धूळ चारली होती. पाकिस्तानच्या कूटनितीला भारतीय सैन्यांतील बहादूर जवानांनी आपल्या बलिदानाने उत्तर दिले. तब्बल अडीच महिने सुरू राहिलेल्या या युद्धात 527 जवानांना वीरमरण आले होते. या जवानांच्या बलिदानाची आठवण म्हणून 26 जुलै हा कारगिल विजय दिवस साजरा करण्यात येतो.
ये मेरे वतन के लोगों, जरा आँखो मे भर लो पाणी !जो शहीद हुए है उनकी, जरा याद करो कुर्बानी !!
16 जुलै 1999 रोजी भारतीय सैन्याने पाकिस्तानला युद्धभूमीत पराभूत करत जगाला आपल्या वीरतेचा संदेश दिला. या युद्धावेळी संपूर्ण देश एकवटल्याचे चित्र आपण पाहिले. सीमेवर लढणाऱ्या जवानांसाठी अनेकांच्या डोळ्यात अश्रू येत होते. तर त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक भारतीय आपल्या परीने प्रयत्न करत होता. अडीच महिने सुरु असलेल्या या युद्धात भारताने 527 भूमीपुत्रांना गमावले तर 1300 पेक्षा अधिक सैनिक जखमी झाले होते. विशेष म्हणजे या युद्धात ज्यांना वीरमरण आले, त्यापैकी बहुतांश जवानांनी वयाची तिशीही पार केली नव्हती. आयुष्यातील उमेदीच्या काळातच या भारतमातेच्या पुत्रांनी देशासाठी बलिदान दिलं. या शहिदांना शौर्य आणि बलिदानाचे प्रतिक उभारले. आपल्या शौर्यातून लढवय्यी प्रेरणा जवानांनी देशाला दिली. या वीर जवानांच्या शौर्याची आठवण करुन देणारा हा दिवस आहे. या जवानांच्या त्याग आणि बलिदानाला आदरांजली वाहण्याचा आजचा दिवस आहे.
हेही वाचा : -
Kargil Vijay Diwas: 'ऑपरेशन बद्र' Vs. 'ऑपरेशन विजय'... का झालं कारगिल युद्ध?