नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कारगिल युद्धात वीरमरण पत्कारणाऱ्या जवानांना आदरांजली वाहिली. कारगिल युद्धातील शहिदांच्या बलिदानाला देश सदैव स्मरणात ठेवेल. या 'ऑपरेशन विजय'मधून भारतीय सैन्याने आपली वीरता दाखवून दिली आहे. कूटनितीने भारतभूमीकडे नजर उठवणाऱ्यांना आम्ही जशास तसे उत्तर देऊ हेच भारतीय सैन्याने जगाले दाखवून दिल्याचे ट्विट मोदींनी केले. तसेच अटलबिहारी वाजपेयींच्या नेतृत्वात भारताने ही कामगिरी केल्याचे सांगायलाही ते विसरले नाहीत.
मोदींनी ट्विट करुन कारगिल युद्धातील 527 जवांनाच्या बलिदान आणि शौर्याला सलाम केला आहे. तसेच जवानांच्या धाडसी कार्याचे कौतूक करताना भारत हा शांतीप्रिय देश असून जर कोणी आम्हाला अशांत करण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही तोडीस तोड उत्तर देऊ, असेही मोदींनी आपल्या ट्विटमधून सूचवले आहे. तसेच संरक्षणमंत्री निर्मला सितारमण यांनीही दिल्लीतील कारगिल युद्धातील जवानांना श्रद्धांजली वाहिली. सितारमण यांच्यासह लष्करप्रमुख बिपीन रावत, भारतीय नेव्ही दलाचे प्रमुख सुनिल लांबा आणि वायूदलाचे प्रमुख मार्शल बिरेंदर सिंग धनोआ यांनीही शहिदांना मानवंदना दिली. भारतीय जवानांच्या शौर्याची आणि विजयाची गाथा सांगणारा आजचा दिवस आहे.
देशभरात 26 जुलै हा दिवस कारगिल विजय दिन म्हणून साजरा केला होता. आजच्याचदिवशी भारतीय सैन्याने पाकिस्तानला काश्मीरमधून पळता भुई थोडी करुन सोडले होते. तर काश्मीरमध्ये तिरंगा फडवला होता. कारगिलच्या युद्धात 527 जवानांना वीरमरण आले, तर 1300 पेक्षा अधिक जवान जखमी झाले होते. मात्र, भारतीय सैन्याने मरते दम तक लढेंगे हे आपल्या बलिदानातून दाखवून दिले. या वीर जवानांना स्मरण करत देशातून कारगिल शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. सरकारमधील मंत्री, राजकीय नेते आणि सर्वसामान्य नागरिकांकडूनही शहिदांना मानवंदना अर्पण केली जात आहे.
राजनाथसिंह यांच्याकडून शहिदांना मानवंदना