मुंबई - भारतीय सामारेषेवर घुसखोरी केलेल्या पाकिस्तानाला 26 जुलै 1999 साली भारतीय सैन्याने पिटाळून लावले. तब्बल अडीच महिने सुरू राहिलेल्या या युद्धात भारतीय जवानांनी पुन्हा एकदा मायभूमीवर तिरंगा फडकवला. या युद्धात भारतीय सैन्याच्या 527 जवानांना वीरमरण आले होते. या जवानांच्या बलिदानाची आठवण म्हणून 26 जुलै हा कारगिल विजय दिवस साजरा करण्यात येतो. त्यामुळेच आज कोट्यवधी भारतीयांकडून आणि सैन्य दलाकडून या वीरपुत्रांना आंदरांजली वाहण्यात येत आहे.
भारत मातेसाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या शूरवीरांच्या आठवणीचा आजचा दिवस आहे. पाकिस्तानला धडा शिकवून जगाला भारताच्या वीरतेचा संदेश देणारा आजचा दिवस आहे. कारण, आज कारगिल दिवस आहे. त्यामुळे 1999 सालच्या युद्धातील आठवणींना उजाळा देत आज कोट्यवधी भारतीय वीर जवानांना श्रद्धांजली वाहत आहेत. सोशल मीडियावरुनही या जवानांच्या कार्याचा गौरव करत त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे. 8 हजार फूट उंची आणि बर्फाळ प्रदेश अशा प्रतिकूल परिस्थितीत भारतीय सैन्यानं धाडसानं शत्रूवर विजय मिळवला. 8 मे रोजी युद्धाला सुरुवात झाली होती. तर 26 जुलै रोजी भारतीय सैन्यानं बर्फानं वेढलेल्या भारतभूमीवर तिरंगा फडकवला.
16 जुलै 1999 रोजी भारतीय सैन्याने पाकिस्तानला युद्धभूमीत पराभूत करत जगाला आपल्या वीरतेचा संदेश दिला. या युद्धावेळी संपूर्ण देश एकवटल्याचे चित्र आपण पाहिले. सीमेवर लढणाऱ्या जवानांसाठी अनेकांच्या डोळ्यात अश्रू येत होते. तर त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक भारतीय आपल्या परीने प्रयत्न करत होता. अडीच महिने सुरु असलेल्या या युद्धात भारताने 527 भूमीपुत्रांना गमावले तर 1300 पेक्षा अधिक सैनिक जखमी झाले होते. विशेष म्हणजे या युद्धात ज्यांना वीरमरण आले, त्यापैकी बहुतांश जवानांनी वयाची तिशीही पार केली नव्हती.
विरेंद्र सेहवागकडून शहिदांना मानवंदना