Delhi Court: दिल्लीन्यायालयातून एक रंजक प्रकरण समोर आले आहे. मुलाला जन्म देणारी महिला त्याला सोडून बेपत्ता झाली होती. शेजारी राहणाऱ्या महिलेने त्या 10 महिन्यांच्या मुलाचा सांभाळ केला आणि त्याला वाढवले. दहा वर्षांनी त्या मुलाची जन्मदाती परत आली आणि तिचा मुलगा परत मागितला. पण, मुलाचा सांभाळ करणाऱ्या जोडप्याने मुलाला परत करण्यास नकार दिला आहे.
यानंतर मुलाच्या आईने पोलिसांत तक्रार केली, त्यानंतर पोलिसांनी मुलाला बालसुधार समितीच्या ताब्यात दिले. आश्चर्याची बाब म्हणजे ती महिला पुन्हा बेपत्ता झाली. लाइव्ह हिंदुस्तानमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, महिलेला कोर्टाने अनेकवेळा हजर राहण्याची नोटीस दिली होती, मात्र पोलिसांनी कोर्टाला सांगितले की, महिलेने चुकीचा पत्ता लिहिला आहे. महिलेचा मोबाईल क्रमांकही बंद होता आणि त्यामुळे मुलाला सात महिने बालसुधारगृहात ठेवावे लागले.
मुलाने खरी आई ओळखण्यास नकार दिलापोलिस तक्रारीनंतर पालक दाम्पत्याने मुलाला आपल्याजवळ ठेवण्यासाठी कोर्टात धाव घेतली. करकरडूमा येथील कौटुंबिक न्यायालयाचे अतिरिक्त प्रधान न्यायाधीश अजय पांडे यांच्या न्यायालयाने मुलाला बालगृहातून आणून न्यायालयात हजर करण्याचे निर्देश दिले. तेव्हा मुलाने सांगितले की, त्याला त्याच्या पालकांना भेटायचे आहे. यानंतर न्यायाधीशांनी मुलाच्या आई-वडिलांचे नाव विचारले असता, त्याने त्याला वाढवणाऱ्या जोडप्याचे नाव घेतले. मुलाने खरी आई ओळखण्यास नकार दिला.
मुलाला वाढवणाऱ्या महिलेने सांगितले की, जी महिला मुलाला स्वतःचे म्हणते आहे, ती प्रत्यक्षात त्याची आई आहे. महिलेने घटनेबद्दल सांगितले की, 10 वर्षांपूर्वी महिला शेजारी भाड्याच्या घरात राहायची आणि तिचा नवरा बाहेर कुठेतरी काम करायचा. 12 ऑक्टोबर 2012 रोजी ही महिला माझ्या घरी आली आणि काही वेळात येईन असे सांगून 10 महिन्यांच्या मुलाला सोडून निघून गेली, मात्र ती परत आलीच नाही. आम्ही पोलिस ठाण्यालाही महिला आणि मुलाबाबत कळवले. त्यानंतर आम्ही त्या मुलाला आमच्या दोन मुलांप्रमाणे सांभाळायला लागलो. पण ऑगस्ट 2022 मध्ये ती महिला अचानक परतली आणि तिने आपल्या मुलाला सोबत नेण्याचा हट्ट धरला. शेवटी हे प्रकरण कोर्टात पोहोचले, तेथून मुलाला त्याच जोडप्याकडे सुपूर्द कर