भाजपा, काँग्रेस की आम आदमी पक्ष, कोणत्या पक्षाच्या उमेदवारांवर गंभीर गुन्हे?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2023 09:51 AM2023-05-05T09:51:13+5:302023-05-05T09:51:40+5:30

४०४ उमेदवारांवर किमान पाच वर्षे किंवा त्याहून अधिक शिक्षेसाठी पात्र असलेले गंभीर गुन्हेगारी खटले दाखल आहेत.

Karnatak Assembly Election: BJP, Congress or Aam Aadmi Party, serious crimes against the candidates of which party? | भाजपा, काँग्रेस की आम आदमी पक्ष, कोणत्या पक्षाच्या उमेदवारांवर गंभीर गुन्हे?

भाजपा, काँग्रेस की आम आदमी पक्ष, कोणत्या पक्षाच्या उमेदवारांवर गंभीर गुन्हे?

googlenewsNext

कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी गुन्हेगारी रेकॉर्ड असलेले अनेक उमेदवार उभे केले आहेत. एका आमदारावर तर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) च्या अहवालानुसार, काँग्रेस पक्षाच्या ३१ टक्के, भाजपच्या ३० टक्के तर जेडीएसच्या २५ टक्के उमेदवारांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात ही माहिती देण्यात आली आहे.

४०४ उमेदवारांवर किमान पाच वर्षे किंवा त्याहून अधिक शिक्षेसाठी पात्र असलेले गंभीर गुन्हेगारी खटले दाखल आहेत. २५४ उमेदवारांवर २०१८ च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान गंभीर गुन्हेगारी खटले होते. त्यानंतर २०२३ पर्यंत यात ६ टक्के वाढ झाली आहे.
४०४ उमेदवारांपैकी ४९ उमेदवारांनी महिलांवरील गुन्ह्यांशी संबंधित गुन्हे घोषित केले आहेत, त्यापैकी एक गुन्हा बलात्काराशी संबंधित आहे. ८ उमेदवारांवर हत्येशी संबंधित गुन्हे आहेत. ३५ उमेदवारांवर खुन करण्याचा प्रयत्न केल्याचे गुन्हे दाखल आहेत.

गंभीर गुन्हेगारी खटले कुणावर? 
काँग्रेसच्या २२१ उमेदवारांपैकी ६९ जणांवर
भाजपच्या २२४ उमेदवारांपैकी ६६ जणांवर
जेडीएसच्या २०८ उमेदवारांपैकी ५२ उमेदवारांवर
आम आदमी पार्टीच्या २११ उमेदवारांपैकी ३० जणांवर

Web Title: Karnatak Assembly Election: BJP, Congress or Aam Aadmi Party, serious crimes against the candidates of which party?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.