प्रचार नेमका कसा?; रस्ते शांत; हुबळीत घरोघरी प्रचारावर जोर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2023 09:17 AM2023-05-05T09:17:29+5:302023-05-05T09:17:48+5:30

भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या हुबळी मतदारसंघात दुपारच्या वेळेत फेरफटका मारला असता सारे काही शांत-शांत असल्याचे जाणवले

Karnatak Assembly Election: How exactly is the campaign?; The streets are quiet; Emphasis on door-to-door campaign in Hubli | प्रचार नेमका कसा?; रस्ते शांत; हुबळीत घरोघरी प्रचारावर जोर

प्रचार नेमका कसा?; रस्ते शांत; हुबळीत घरोघरी प्रचारावर जोर

googlenewsNext

चंद्रकांत कित्तुरे

हुबळी : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी धारवाड जिल्ह्यातील सातही मतदारसंघांत सर्वच पक्षांनी प्रचाराचा धूमधडाका लावला असला रस्त्यांवर मात्र निवडणुकीचे कसलेही वातावरण दिसत नाही. सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि वृत्तपत्रांमधूनच निवडणुकीचे वातावरण तापले आहे.

भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या हुबळी मतदारसंघात दुपारच्या वेळेत फेरफटका मारला असता सारे काही शांत-शांत असल्याचे जाणवले. उमेदवारांच्या प्रचारार्थ फिरणारी वाहने नाहीत की रस्त्यांवर मोठ-मोठाले बॅनरही नाहीत. प्रचार कार्यालयात तेवढीच कार्यकर्त्यांची लगबग जाणवते. नाही म्हणायला प्रचारसभांना गर्दी असते. मात्र, ती उत्स्फूर्त असते की जमवलेली, हा संशोधनाचा विषय आहे.

९२ उमेदवार रिंगणात
धारवाड जिल्ह्यातील सात मतदारसंघांत ९२ उमेदवार रिंगणात आहेत. त्यांतील सर्वाधिक चर्चेत आहेत माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर. भाजपने उमेदवारी नाकारल्याने काँग्रेसमध्ये प्रवेश करून त्यांनी भाजपलाच आव्हान दिले आहे. हुबळी-धारवाडमध्ये या मतदारसंघात त्यांची थेट लढत भाजपचे महेश टेंगिनकाई यांच्याशी होत आहे. हे दोन्ही उमेदवार भाजप आणि काँग्रेससाठी प्रतिष्ठेचे आहेत; यामुळे राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील नेते त्यांच्या विजयासाठी सभा घेत आहेत. 

घरोघरी भेटी, कोपरा सभांवर जोर
काही राजकीय कार्यकर्त्यांशी संवाद साधला असता, आमचा आणि उमेदवारांचा मतदारांच्या घरोघरी जाऊन भेटी घेण्यावर भर आहे.  कोपरा सभाही सुरू आहेत. त्याला मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे, असे त्यांनी सांगितले.

 

Web Title: Karnatak Assembly Election: How exactly is the campaign?; The streets are quiet; Emphasis on door-to-door campaign in Hubli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.