शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

कर्नाटकात सर्व विद्यार्थ्यांना कन्नड भाषा शिकणे सक्तीचे

By admin | Published: April 01, 2015 11:23 PM

कर्नाटकच्या सर्व शाळांमधील इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना कन्नड भाषा शिकण्याची सक्ती करणाऱ्या कायद्याच्या विधेयकास राज्य विधानसभेने मंगळवारी मंजुरी दिली.

बंगळुरू : कर्नाटकच्या सर्व शाळांमधील इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना कन्नड भाषा शिकण्याची सक्ती करणाऱ्या कायद्याच्या विधेयकास राज्य विधानसभेने मंगळवारी मंजुरी दिली.राज्यातील सर्व शाळांनी २०१५-१६ या शैक्षणिक वर्षापासून एक सक्तीचा भाषा विषय म्हणून कन्नडचे शिक्षण टप्प्याटप्प्याने द्यायला हवे, असा धोरणात्मक निर्णय राज्य सरकारने याआधीच घेतला होता. हे विधेयक त्याच धोरणाचे कायद्यात रूपांतर करण्यासाठी आहे, असे शालेय शिक्षणमंत्री किम्मने रत्नाकर यांनी विधानसभेत विधेयक मांडताना सांगितले.केरळसारख्या दक्षिणेकडील इतर राज्यांतही शाळांमध्ये स्थानिक भाषेचे शिक्षण देणे सक्तीचे करण्यात आले आहे, याकडेही मंत्र्यांनी लक्ष वेधले.या नव्या कायद्यानुसार कर्नाटकमधील सर्व शाळांना प्रथम अथवा द्वितीय भाषा म्हणून सर्व विद्यार्थ्यांना कन्नड भाषेचे शिक्षण द्यावे लागेल. सध्या ज्या शाळांमध्ये पहिली किंवा दुसरी भाषा म्हणून कन्नड हा विषय शिकविला जात नाही, त्यांना २०१५-१६ या शैक्षणिक वर्षापासून हा विषय पहिल्या इयत्तेच्या अभ्यासक्रमात अंतर्भूत करून पुढे तो टप्प्याटप्प्याने इयत्ता दहावीपर्यंत वाढवत न्यावा लागेल. (वृत्तसंस्था)