कर्नाटक विधानसभा पोटनिवडणूक, काँग्रेसने मान्य केला पराभव 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2019 12:31 PM2019-12-09T12:31:48+5:302019-12-09T12:32:16+5:30

राज्यात सत्तेवर असलेल्या येडियुरप्पा सरकारच्या दृष्टीने आजचा पोटनिवडणुकीचा निकाल महत्त्वपूर्ण आहे.

Karnataka assembly bypolls : Congress accepted the defeat | कर्नाटक विधानसभा पोटनिवडणूक, काँग्रेसने मान्य केला पराभव 

कर्नाटक विधानसभा पोटनिवडणूक, काँग्रेसने मान्य केला पराभव 

googlenewsNext

बंगळुरू - संपूर्ण देशातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेल्या कर्नाटक विधानसभेच्या  पोटनिवडणुकीत भाजपाने मोठ्या विजयाच्या दिशेने आगेकूच केली आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार भाजपाने 4 जागांवर विजय मिळवला आहे, तर 8 जागांवर भाजपाचे उमेदवार आघाडीवर आहेत. दरम्यान, पोटनिवडणुकीच्या निकालांचे कल हाती येऊ लागल्यानंतर काँग्रेसने आपला पराभव मान्य केला आहे. आम्ही आमचा पराभव मान्य करतो, मतदारांनी बंडखोरांना स्वीकारल्याचे या निकालांमधून दिसत आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डी. के. शिवकुमार यांनी दिली आहे. 

राज्यात सत्तेवर असलेल्या येडियुरप्पा सरकारच्या दृष्टीने आजचा पोटनिवडणुकीचा निकाल महत्त्वपूर्ण आहे. त्यात पक्षाने आघाडी घेतल्याने येडियुरप्पा आणि भाजपाला दिलासा मिळाला आहे. दरम्यान, काँग्रेसने कल हाती आल्यानंतर आपली हार मान्य केली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डी. के. शिवकुमार निकालांवर प्रतिक्रिया देताना म्हणाले की,  ''15 विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत मतदारांनी दिलेल्या जनादेशाशी आपल्याला सहमत व्हावे लागेल. मतदारांनी पक्षांतर करणाऱ्या उमेदवारांना स्वीकारले आहे. मात्र या निकालांमुळे निराश होण्याची गरज नाही,'' 



2018 मध्ये कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा त्रिशंकू निकाल लागल्यापासून राज्यात सत्तासंघर्ष सुरू आहे. त्यावेळी सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसने जेडीएसला पाठिंबा दिला होता. मात्र काँग्रेस आणि जेडीएस सरकारमधील 17 आमदारांनी बंडखोरी केल्याने जुलै महिन्यात एच .डी . कुमारस्वामी यांचे सरकार कोसळले होते. त्यानंतर राज्यात येडियुरप्पा यांच्या नेतृत्वात भाजपाने पुन्हा एकदा सत्ता मिळवली. मात्र, ज्या आमदारांनी राजीनामे देत एच .डी . कुमारस्वामी सरकारचा पाठिंबा काढून घेतला. या आमदारांना तत्कालीन विधानसभा अध्यक्षांनी अपात्र ठरविले होते. आमदार अपात्र ठरल्याने रिक्त झालेल्या 15 मतदारसंघांमध्ये 5 डिसेंबर रोजी पोटनिवडणूक घेण्यात आली होती. 

Web Title: Karnataka assembly bypolls : Congress accepted the defeat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.