बंगळुरू- कर्नाटकात विधानसभा 2018च्या निवडणुकीच्या प्रचारात जोरदार कलगीतुरा रंगलेला पाहायला मिळतो आहे. सत्ताधारी काँग्रेसनं सभांचा धडाका लावलेला असून, राहुल गांधी स्वतः प्रचाराची धुरा सांभाळत आहेत. तर दुसरीकडे भाजपाकडून अमित शाहा प्रचारात सक्रिय झालेत. परंतु या विधानसभेचा कौल त्रिशंकू येण्याचा अंदाज वर्तवला जातोय. त्याच पार्श्वभूमीवर एच. डी. देवेगौडा यांनी पाठिंब्याबाबत सूचक विधान केलं आहे.कर्नाटकात त्रिशंकू परिस्थिती उद्भवल्यास आम्ही काँग्रेससोबत जाऊ, असंही देवेगौडा म्हणाले आहेत. तसेच त्यांनी भाजपावर टीकेची झोड उठवली आहे. कर्नाटकाला भाजपाच्या सत्ताकाळात प्रचंड अडचणींना सामना करावा लागला. 5 वर्षांत भाजपानं तीन मुख्यमंत्री बदलले. हे कर्नाटकासाठी भाजपाचं योगदान आहे. परंतु पाच वर्षांत काँग्रेसनं एकच मुख्यमंत्री ठेवला. त्यांनी सरकारी नोकरदारांसाठी काय केलं पाहा. मी काँग्रेसला महापालिका निवडणुकीत पाठिंबा दिल्यानं माझ्यावर टीकाही करण्यात आली.
Karnataka Assembly Election 2018- ...तर मी काँग्रेसला पाठिंबा देईन- एच. डी. देवेगौडा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2018 9:40 AM