Karnataka Assembly Election 2023: माझ्या नेतृत्वात काँग्रेसला 135 जागा मिळाल्या; हायकमांडने योग्य तो निर्णय घ्यावा- डीके शिवकुमार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2023 07:23 PM2023-05-15T19:23:26+5:302023-05-15T19:32:37+5:30
Karnataka Assembly Election 2023: कर्नाटक काबीज केल्यानंतर आता काँग्रेसमोर मुख्यमंत्रिपदाचा व्यक्ती ठरवण्याचे मोठे आव्हान आहे.
Karnataka Election: कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर आता मुख्यमंत्र्यांच्या नावावरुन पक्षात गोंधळ उडाला आहे. एकीकडे कर्नाटकचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार मुख्यमंत्रिपदाचा दावा करत आहेत, तर दुसरीकडे दिग्गज सिद्धरमय्या आपला दावा सांगत आहेत. या गोंधळादरम्यान डीके शिवकुमार यांनी मोठा दावा केला आहे.
माध्यमांशी संवाद साधताना शिवकुमार म्हणाले की, माझ्या नेतृत्वात काँग्रेसने कर्नाटकात 135 जागा जिंकल्या आहेत. काल (रविवारी) 135 आमदारांनी मतदान केले आणि एका ओळीचा ठराव मंजूर केला. मुख्यमंत्र्यांबद्दल त्यांच्या मनात काय मत आहे, ते सांगितले. यावेळी त्यांनी हायकमांडला भेटण्यासाठी दिल्लीला जात असल्याचेही सांगितले.
"Under my leadership, Congress got 135 seats," DK Shivakumar to reach Delhi today for next Karnataka CM talks
— ANI Digital (@ani_digital) May 15, 2023
Read @ANI Story | https://t.co/LPquVvALQL#Karnataka#Congress#KarnatakaCM#DKShivakumar#Delhipic.twitter.com/2nVuT5utnU
शिवकुमार पुढे म्हणाले की, माझे संख्याबळ काँग्रेसचे संख्याबळ आहे. माझा विश्वास आहे की, एकटा माणूस बहुमत आणू शकतो. 5 वर्षात माझ्यासोबत काय-काय झालंय, ते मला वेगळं सांगायची गरज नाही. मी राहुल गांधी, सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांना आश्वासन देतो की, कर्नाटकात काँग्रेससाठी काम करणे हे माझे ध्येय आहे. आम्ही काम करू असे लेखी आश्वासन दिले आहे. बाकी हायकमांडने योग्य तो निर्णय घ्यायचा आहे.
दरम्यान, सिद्धरमैय्या आणि डीके शिवकुमार यांच्यापैकी कोणाला मुख्यमंत्री बनवायचे याबाबत काँग्रेस हायकमांड अजूनही संभ्रमात आहे. यातच आता डीके शिवकुमार यांच्या या दाव्याने उत्सुकता वाढली आहे.