मुंबई - महाराष्ट्राचा शेजारी असलेल्या कर्नाटक राज्यातील विधानसभा निवडणुकांचा निकाल आज जाहीर होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र आणि कर्नाटक हा सीमावाद सुरू असून काही महिन्यांपूर्वीच हा वाद देशपातळीवर चर्चेत होता. मुख्यमंत्री बोम्मई यांनी केलेल्या विधानामुळे महाराष्ट्र सरकारनेही या काही महत्त्वाचे निर्णय त्यावेळी घेतले. त्यामुळे, सीमाभागातील मतदारसंघांकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. त्यातच, महाराष्ट्र एकीकरण समितीसोबत आपण राहिले पाहिजे, असा सूर शिवसेनेनसह काही नेत्यांनी घेतला होता. त्यामुळे, बेळगावसह सीमाभागातील ५ जिल्ह्यातील निकालांकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
सीमाभागातील बेळगाव, विजयपूर (विजापूर) जिल्हा, कलबुर्गी (गुलबर्गा) जिल्हा, बिदर जिल्हा आणि बागलकोट या ५ जिल्ह्यातील २८ मतदारसंघांच्या लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यांच्या सीमाभागांतील या लढती आहेत. या लढतीमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवारही निवडणुकांच्या रिंगणात आहेत. बेळगाव जिल्ह्यात चुरशीने झालेल्या मतदानाची मोजणी शनिवारी (दि. १३) होणार असून या निवडणुकीत कोण बाजी मारणार, याबाबत अनेक तर्क-वितर्क लढवण्यात येत आहेत. दुपारपर्यंत संपूर्ण निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.
बेळगाव जिल्हा : निपाणी, चिक्कोडी-सदलगा, कागवाड, अथणी, यमकनमर्डी, बेळगाव दक्षिण, बेळगाव उत्तर, बेळगाव ग्रामीण, खानापूर, गोकाक, हुक्केरी.
विजयपूर (विजापूर) जिल्हा : विजयपूर शहर, इंडी, सिंदगी, बबलेश्वर.
कलबुर्गी (गुलबर्गा) जिल्हा : अफजलपूर, आळंद, चिंचोली, कलबुर्गी ग्रामीण, कलबुर्गी दक्षिण, कलबुर्गी उत्तर.
बिदर जिल्हा : बसवकल्याण, बिदर, भालकी, औराद
बागलकोट जिल्हा : मुधोळ, जमखंडी, बागलकोट
या सर्व मतदारसंघांत मराठी भाषिक मतदारांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे, महाराष्ट्राचे लक्ष या लढतींकडे लागले असून येथे मराठी उमेदवारांना मतदारासांची पसंती मिळाली का हे निकालानंतरच स्पष्ट होईल.
बेळगाव जिल्ह्यातील प्रमुख लढती
१) निपाणी : शशिकला ज्वोल्ले (भाजप), काकासाहेब पाटील (काँग्रेस), उत्तम पाटील (राष्ट्रवादी)२) हुक्केरी : निखिल कत्ती (भाजप), ए. बी. पाटील (काँग्रेस)३) खानापूर : डॉ. अंजली निंबाळकर (काँग्रेस), मुरलीधर पाटील (महाराष्ट्र एकीकरण समिती), विठ्ठल हलगेकर (भाजप), नासिर बागवान (जनता दल -धर्मनिरपेक्ष)४) बेळगाव दक्षिण : रमाकांत कोंडूसकर (महाराष्ट्र एकीकरण समिती), अभय पाटील (भाजप), प्रभावती मास्तमर्डी (काँग्रेस)५) बेळगाव उत्तर : असिफ सेठ (काँग्रेस), डॉ. रवी पाटील (भाजप), अमर येळ्ळूरकर (महाराष्ट्र एकीकरण समिती)६) बेळगाव ग्रामीण : लक्ष्मी हेब्बाळकर (काँग्रेस), नागेश मन्नोळकर (भाजप), आर. एम. चौगुले (महाराष्ट्र एकीकरण समिती)७) यमकनमर्डी : सतीश जारकीहोळी (काँग्रेस), बसवराज हुंदरी (भाजप), मारुती अष्टगी (जनता दल- धर्मनिरपेक्ष)८) गोकाक : रमेश जारकीहोळी (भाजप), डॉ. महांतेश कडाडी (काँग्रेस)९) चिक्कोडी-सदलगा : गणेश हुक्केरी (काँग्रेस), रमेश कत्ती ( भाजप)१०) अथणी : लक्ष्मण सवदी (काँग्रेस), महेश कुमठळ्ळी (भाजप)११) कागवाड : श्रीमंत पाटील (भाजप), राजू कागे (काँग्रेस