13 May, 23 05:47 PM
जगदीश शेट्टर यांचा पराभव
जगदीश शेट्टर यांचा पराभव, भाजपाच्या महेश टेंगिनकाई यांनी 34,289 मतांनी हरविले.
13 May, 23 04:50 PM
जेडीएसची पाच टक्के मते कमी झाली, ती काँग्रेसला मिळाली - फडणवीस
काही लोकांना देश जिंकला असे वाटत आहे. त्यांनी आधीच्या निवडणुकीचे निकाल बघावेत. कर्नाटकात आम्हाला अपेक्षित यश मिळाले नाही. 1985 पासून कुठलेच सरकार रिपीट होऊ शकले नाही. यावेळी तो ट्रेंड तोडू शकलो नाही. २०१८ मध्ये आम्हाला जितकी मते मिळाली, त्यात अर्धा टक्का मते कमी झालीत. पण जागा मोठ्या संख्येने कमी झाल्या. जेडीएसची पाच टक्के मते कमी झाली, ती काँग्रेसला मिळाल्याचे विश्लेषण फडणवीस यांनी मांडले.
13 May, 23 03:59 PM
भाजपसाठी विजय-पराजय नवीन नाही. - येडीयुराप्पा
"भाजपसाठी विजय-पराजय नवीन नाही. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या निकालांनी घाबरून जाण्याची गरज नाही. पक्षाच्या पराभवाचे आम्ही आत्मपरीक्षण करू. हा निकाल मी आदरपूर्वक स्वीकारतो," असे भाजप नेते बीएस येडियुरप्पा यांनी पक्षाच्या पराभवावर म्हटले आहे.
13 May, 23 03:03 PM
काँग्रेसने आतापर्यंत ३६ जागा जिंकली, तर भाजपा १७
निवडणूक आयोगानुसार काँग्रेस १३७ पैकी १०१ जागांवर आघाडीवर तर ३६ जागा जिंकली आहे. भाजपा ४५ जागांवर आघाडीवर असून १७ जागा जिंकल्या आहेत.
13 May, 23 02:47 PM
या निकालाने संजय राऊतांच्या कानशिलात बसली - संजय गायकवाड
महाराष्ट्र एकीकरण समिती पिछाडीवर पडली त्यामुळे या निकालाने संजय राऊतांच्या कानशिलात बसली - संजय गायकवाड
13 May, 23 01:53 PM
आजचा निकाल आगामी निवडणुकांचे चित्र स्पष्ट करणारा - शरद पवार
आजचा निकाल आगामी निवडणुकांचे चित्र स्पष्ट करणारा आहे. खोक्याचे राजकारण जनतेला आवडले नाही. कर्नाटकच्या निकालाबाबत काँग्रेसचे अभिनंदन करतो. महाविकास आघाडीची पुढील आखणी आत्ताच बसून करावी असा विचार माझ्या मनात आहे. लोकांनी भाजपाला नाकारले आहे. कर्नाटक, तामिळनाडू, पंजाब, केरळ, तेलंगणा, आंध्रप्रदेश, राजस्थान इथं भाजपा सरकारला नाकारले. हळूहळू देशाची स्थिती बदलेल - शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस
13 May, 23 01:43 PM
काँग्रेसच्या मतांची टक्केवारी वाढली, १२९ जागांवर आघाडी
निवडणूक आयोगाच्या डेटानुसार, काँग्रेसची मतांची टक्केवारी ४३ टक्क्यांपर्यंत वाढली. सध्या पक्ष १२९ जागांवर आघाडीवर आहे. ४ जागा काँग्रेसने जिंकल्या आहेत. तर भाजपाच्या मतांची टक्केवारी ३५.८ टक्क्यांपर्यंत घसरली.
13 May, 23 01:17 PM
पैशांचा वापर करून ओपरेशन लोटस केले जाते - दिग्विजय सिंह
भाजपाकडे कोट्यवधीचा पैसा आहे. हा पैसा कुठून येतो? कर्नाटकात मजबूत सरकार आले. ऑपरेशन लोटसमध्ये ज्यांनी काँग्रेसला सोडले त्यांना भाजपाने तिकीटही दिले नाही. इतकेच नाही तर अनेकांची अवस्था निकालात काय झालीय हे पाहा. ज्योतिरादित्य शिंदे कर्नाटकात नाही - दिग्विजय सिंह, काँग्रेस नेते
13 May, 23 12:53 PM
बेळगाव दक्षिण मतदारसंघातून भाजपाचे अभय पाटील विजयी
बेळगाव दक्षिण मतदारसंघातून भाजपाचे अभय पाटील विजयी झाले असून याठिकाणी महाराष्ट्र एकिकरण समितीचे रमाकांत कोंडुसकर यांनी दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली आहेत.
13 May, 23 12:30 PM
निकालाचे विश्लेषण करू अन् लोकसभेत कमबॅक करू - बोम्मई
कर्नाटक निवडणुकीत पंतप्रधानापासून भाजपा कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांनी मेहनत घेतली. आम्हाला बहुमत मिळाले नाही. अंतिम निकाल आल्यानंतर आम्ही त्याचे विश्लेषण करू आणि पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीत कमबॅक करू असा विश्वास मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी व्यक्त केला
13 May, 23 12:27 PM
चेन्नईत काँग्रेस कार्यकर्त्यांचा विजयी जल्लोष
13 May, 23 12:07 PM
उद्या काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होणार
विधानसभेत स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर काँग्रेस विधिमंडळ पक्षाची उद्या बंगळुरूत बैठक होणार, सर्व विजयी आमदारांना बंगळुरूत येण्याचा निरोप
13 May, 23 11:53 AM
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांचा जल्लोष
13 May, 23 11:43 AM
कर्नाटकात काँग्रेसला बहुमत, भाजपाची सत्ता जाण्याची शक्यता
कर्नाटकात काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. निकालाच्या कलांनुसार, काँग्रेस ११९, जेडीएस २५ तर भाजपा ७२ जागांवर आघाडीवर आहे. तर इतर ८ जण आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे.
13 May, 23 11:29 AM
८ पैकी ५ अपक्ष काँग्रेसच्या संपर्कात असल्याची माहिती
कर्नाटकात काँग्रेसने सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू केल्या असून अपक्ष ८ उमेदवारांपैकी ५ जण काँग्रेस नेत्यांच्या संपर्कात आहेत. आम्हाला सत्तास्थापनेसाठी कुणाची मदत लागणार नाही असं सिद्धरमैय्या म्हणाले होते. परंतु काँग्रेस कुठलीही जोखीम पत्करायला तयार नाही.
13 May, 23 11:08 AM
बेळगाव दक्षिणेत महाराष्ट्र एकिकरण समितीच्या उमेदवाराची आघाडी
बेळगाव दक्षिण मतदारसंघात महाराष्ट्र एकीकरण समितीचे रमाकांत कोंडूसकर आघाडीवर तर भाजपाचे अभय पाटील पिछाडीवर आहेत.
13 May, 23 10:33 AM
अथणी मतदारसंघात काँग्रेसचे लक्ष्मण सवदी आघाडीवर
अथणी मतदारसंघातून काँग्रेसचे लक्ष्मण सवदी सध्या आघाडीवर आहेत तर भाजपाचे महेश कुमठळ्ळी पिछाडीवर आहेत.
13 May, 23 10:31 AM
सौंदती मतदारसंघातून काँग्रेसचे विश्वास वैघ आघाडीवर
सौंदती मतदारसंघातून भाजपाच्या रत्ना मामणी पिछाडीवर आहेत तर काँग्रेसचे विश्वास वैघ आघाडीवर असल्याचा कल दिसून येत आहे
13 May, 23 10:23 AM
कर्नाटकातील पराभव हा पंतप्रधान मोदींचा पराभव - संजय राऊत
देशाची मन की बात कर्नाटकच्या निकालातून बाहेर पडली, २०२४ च्या निवडणुकीत जे कर्नाटकात झाले तेच देशात होईल. कर्नाटकच्या जनतेने खोके सरकारच्या नेत्यांना लाथाडले, राज्यातील मोठी टोळी कर्नाटकात गेली होती. कर्नाटकातील पराभव हा मोदींचा पराभव आहे. आपल्याच लोकांचा पराभव करण्यासाठी पैशांचा वापर खोके सरकारने केला, संजय राऊतांचा भाजपावर हल्लाबोल
13 May, 23 10:17 AM
कर्नाटकात काँग्रेसची ११० जागांवर आघाडी
कर्नाटकमध्ये काँग्रेस ११०, भाजपा ७१ तर जेडीएस २३ जागांवर आघाडीवर आहे. आतापर्यंतच्या आलेल्या कलांमध्ये भाजपाची सत्ता जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
13 May, 23 10:08 AM
बेळगाव ग्रामीणमध्ये काँग्रेस उमेदवार आघाडीवर
बेळगाव ग्रामीण मतदारसंघातून काँग्रेसच्या लक्ष्मी हेब्बाळकर सध्या आघाडीवर आहेत तर भाजपाचे नागेश मन्नोळकर पिछाडीवर
13 May, 23 10:06 AM
कर्नाटकात जेडीएस किंगमेकरच्या भूमिकेत
भाजपा नेते जेडीएसच्या संपर्कात असल्याची सूत्रांची माहिती, काँग्रेसला बहुमतसाठी काहीच जागांची आवश्यकता, जेडीएस किंगमेकरच्या भूमिकेत
13 May, 23 10:05 AM
सर्व उमेदवारांना बंगळुरूत येण्याचा काँग्रेसचा निरोप
निकालाचे कल पाहता काँग्रेसने सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू केल्या, काँग्रेसच्या सर्व उमेदवारांना तातडीने बंगळुरूला बोलवले
13 May, 23 10:03 AM
काँग्रेस नेते जगदीश शेट्टार पिछाडीवर
कर्नाटकात भाजपातून काँग्रेसमध्ये गेलेले जगदीश शेट्टार हुबळी धारवाड मतदारसंघातून पिछाडीवर
13 May, 23 09:54 AM
कर्नाटकच्या निकालाचे कल पाहता दिल्लीत काँग्रेस कार्यालयाबाहेर आनंदोत्सव
13 May, 23 09:53 AM
बंगळुरूत मतमोजणी केंद्राबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष
13 May, 23 09:52 AM
काँग्रेसने आघाडीवर असलेल्या सर्व उमेदवारांना बंगळुरूमध्ये बोलावले
13 May, 23 09:51 AM
सुरुवातीच्या कलांमध्ये काँग्रेस पुढे, भाजपाची चिंता वाढली
आतापर्यंत आलेल्या सुरुवातीच्या कलानुसार काँग्रेस ८५, भाजपा ६२ तर जेडीएस १८ जागांवर आघाडीवर आहे, त्याचसोबत २ अपक्षही आघाडीवर आहेत.
13 May, 23 09:42 AM
रायबागमध्ये काँग्रेस उमेदवार महावीर मोहिते पिछाडीवर
रायबाग मतदारसंघातून भाजपाचे दुर्याधन ऐहाळे आघाडीवर असून याठिकाणी काँग्रेसचे महावीर मोहिते पिछाडीवर आहेत.
13 May, 23 09:37 AM
माजी मुख्यमंत्री येडियुरप्पांचा मुलगा पिछाडीवर
शिकारीपुरा विधानसभा जागेवर माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचा मुलगा विजयेंद्र सुरुवातीच्या कलांमध्ये पिछाडीवर आहे.
13 May, 23 09:32 AM
बेळगाव उत्तरमधून भाजपा उमेदवार आघाडीवर
बेळगाव उत्तर मतदारसंघातून भाजपाचे डॉ. रवी पाटील आघाडीवर आहे. तर काँग्रेसचे असिफ शेठ पिछाडीवर आहे.
13 May, 23 09:29 AM
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी पिछाडीवर
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी चन्नपटना विधानसभा जागेवर पिछाडीवर आहे.
13 May, 23 09:18 AM
निपाणीत राष्ट्रवादीचे उत्तम पाटील आघाडीवर
निपाणी मतदारसंघात भाजपाच्या शशिकला जोल्ले पिछाडीवर असून राष्ट्रवादीचे उत्तम पाटील आघाडीवर आहे.
13 May, 23 09:15 AM
आता काहीही सांगणे खूप घाईचे ठरेल - सदानंद गौडा
आतापर्यंत अंतिम निकाल आला नाही, अजूनही बरेच राऊंड बाकी आहेत. प्रत्येक टप्प्यात लढत आहे. कारण विरोधी पक्ष काँग्रेस-जेडीएस यांनी हातमिळवणी केली होती - सदानंद गौडा, भाजपा नेते
13 May, 23 09:08 AM
बेळगावात काँग्रेस सर्वाधिक जागांवर आघाडीवर
बेळगाव भागात भाजपा ३ जागा तर काँग्रेस १४ जागांवर आघाडीवर आहे, याठिकाणी महाराष्ट्र एकिकरण समितीच्या उमेदवारांना अद्याप आघाडी नाही.
13 May, 23 09:04 AM
कागवाडमध्ये भाजपा पिछाडीवर तर काँग्रेस आघाडीवर
कागवाडमध्ये भाजपाचे श्रीमंत पाटील पिछाडीवर, तर काँग्रेसचे राजू कागे आघाडीवर
13 May, 23 08:58 AM
कर्नाटक निवडणुकीत भाजपा-काँग्रेस कोण बाजी मारणार?
कर्नाटक निवडणुकीच्या निकालाचे कल आता हळूहळू स्पष्ट होत आहेत, त्यात काँग्रेस-भाजपा यांच्यात काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. निकालाचे लाईव्ह अपडेट आणि विश्लेषण पाहा
13 May, 23 08:20 AM
निकालाच्या आधी मुख्यमंत्र्यांनी घेतले बजरंगबलीचे दर्शन
मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी हुबळी येथील हनुमान मंदिरात जात दर्शन घेतले
13 May, 23 08:10 AM
भाजपा पूर्ण बहुमताने पुन्हा सरकार स्थापन करेल - मुख्यमंत्री
कर्नाटकच्यादृष्टीने आजचा दिवस मोठा आहे. मला विश्वास आहे की, भाजपा पूर्ण बहुमताने राज्यात पुन्हा सरकार स्थापन करेल - मुख्यमंत्री बसवराज बोम्मई
13 May, 23 08:05 AM
निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात, पहिला कौल लवकरच हाती येणार
कर्नाटक निवडणुकीच्या २२४ जागांसाठीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून २६१५ उमेदवारांचे भवितव्य आज स्पष्ट होणार आहे.
13 May, 23 07:42 AM
माझा छोटा पक्ष, राज्यात चांगल्या विकासाची अपेक्षा - एचडी कुमारस्वामी
एक्झिट पोल दाखवतात की दोन्ही राष्ट्रीय पक्ष मोठ्या प्रमाणात स्कोअर करतील. एक्झिट पोलने JD(S) ला 30-32 जागा दिल्या आहेत. येत्या २-३ तासांत निकाल स्पष्ट होईल. माझा एक छोटा पक्ष आहे, माझी कोणतीही मागणी नाही. मला चांगल्या विकासाची आशा आहे - जेडी(एस) नेते एचडी कुमारस्वामी
13 May, 23 07:33 AM
मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर पोलीस बंदोबस्त
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या हुबळी येथील निवासस्थानाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त, निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात पोलिसांनी सुरक्षेची खबरदारी घेतली
13 May, 23 07:29 AM
"काँग्रेसला १२० पेक्षा जास्त जागांसह स्पष्ट बहुमत मिळेल"
आज खूप मोठा दिवस आहे. काँग्रेस विजयी होईल, असा आम्हाला विश्वास आहे. आम्हाला १२० पेक्षा जास्त जागांसह स्पष्ट बहुमत मिळेल. केवळ एक्झिट पोल काँग्रेसच्या विजयाचे भाकीत करत नाहीत, तर प्रत्यक्षात ग्राऊंडवरही तेच दिसून येत आहे, लोकांना बदल हवा आहे - के रहमान खान, काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री