डीके शिवकुमार मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीतून माघार घेण्यास तयार नाहीत, खरगे आज बेंगळुरूला जाणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2023 08:18 AM2023-05-17T08:18:28+5:302023-05-17T08:20:56+5:30

मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत काँग्रेसचे डीके शिवकुमार आणि दिग्गज नेते सिद्धरामय्या आहेत. यात डीके आघाडीवर आहेत.

karnataka assembly election 2023 will cbi ed and income tax cases hamper dk shivakumar chances as next karnataka cm | डीके शिवकुमार मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीतून माघार घेण्यास तयार नाहीत, खरगे आज बेंगळुरूला जाणार

डीके शिवकुमार मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीतून माघार घेण्यास तयार नाहीत, खरगे आज बेंगळुरूला जाणार

googlenewsNext

कर्नाटकात नव्या मुख्यमंत्र्यांवर सस्पेन्स कायम आहे. सलग चार दिवस विचारमंथन करणाऱ्या काँग्रेस हायकमांडमध्ये आजपर्यंत एकाही नावावर एकमत होऊ शकलेले नाही. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांच्यातील स्पर्धा सातत्याने वाढत आहे. या शर्यतीत डीके शिवकुमार हे आघाडीवर असल्याचे मानले जात आहे. डीके यांनी गेल्या काही महिन्यांत खुल्या मनाने मुख्यमंत्रिपदाची आपली आकांक्षा स्वीकारली आहे आणि ते दावेदारांपैकी एक आहेत.डीके शिवकुमार कर्नाटकचे पुढील मुख्यमंत्री होतील की नाही याचा निर्णय पक्ष हायकमांडने घेतलेला नाही. डीके शिवकुमार यांच्यावरील ED, CBI मधील प्रकरण पुढील मुख्यमंत्री बनण्याच्या शक्यतांना बाधा आणू शकतात. 

सरकारने पुन्हा दिल्या ७१ हजार नोकऱ्या; मोदी यांच्या हस्ते नियुक्तिपत्रांचे वितरण

डीके शिवकुमार यांच्या विरोधात १९ प्रकरणे नोंदवली आहेत, त्यापैकी अनेक प्रकरणांची केंद्रीय एजन्सी - आयकर विभाग, सीबीआय आणि ईडी द्वारे चौकशी केली सुरू आहे. यामुळे काँग्रेस हायकमांड विचार करत आहे. सिद्धरामय्या किंवा डीके शिवकुमार यांच्याबाबत पक्षातील प्रमुख नेत्यांचे मत वेगळे असल्याचेही बोलले जात आहे.

राहुल गांधी आणि केसी वेणुगोपाल यांनी सिद्धरामय्या यांना पाठिंबा दिला आहे, तर पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी कोणताही निर्णय जाहीर केलेला नाही. तर सोनिया गांधी यांचे डीके शिवकुमार यांच्याशी चांगले संबंध आहेत. बहुतांश आमदार सिद्धरामय्या यांच्यासोबत असल्याचे मानले जात आहे. याशिवाय रणदीप सुरजेवालाही दोन्ही नेत्यांबाबत तटस्थ आहेत.

२०१७ मध्ये आयकर विभागाने डीके शिवकुमार यांच्या घरावर छापा टाकला होता. शिवकुमारशी थेट संबंध असलेल्या नवी दिल्लीतील चार ठिकाणांवर छापे टाकून साडेआठ कोटी रुपये जप्त करण्यात आले. आयकर विभागाला सफदरजंग एन्क्लेव्ह, नवी दिल्ली येथे खरेदी केलेले तीन फ्लॅट्सही सापडले, ज्यांचा शिवकुमार यांच्याशी संबंध असल्याचा आरोप आहे. आयकर विभागाने ४२९ कोटींहून अधिक बेहिशेबी पैसे सापडल्याचा दावा केला आहे. आयकर विभागाने शिवकुमार, हौमंथैया आणि इतर, नवी दिल्लीतील कर्नाटक भवनातील कर्मचारी आणि जवळच्या साथीदारांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे.

आयकर विभागाने दाखल केलेल्या आरोपपत्राच्या आधारे अंमलबजावणी संचालनालयाने कारवाई केली आणि डीके शिवकुमार यांच्याविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. २०० कोटी रुपयांचा बेहिशेबी पैसा सापडल्याचा ईडीचा दावा आहे. हे पैसे कथितरित्या असल्याचे डीके शिवकुमार यांनी दावा केला. तपास एजन्सीनुसार, त्यांच्याकडे डीके शिवकुमार यांच्या २० बँकांमधील ३१७ खात्यांचा तपशील आहे. या खात्यांमध्ये २०० कोटी रुपयांहून अधिक रक्कम असल्याचे एजन्सीने म्हटले होते.

ईडीने डीके शिवकुमार यांच्या ८०० कोटी रुपयांच्या कथित बेनामी संपत्तीशी संबंधित कागदपत्रे जप्त केल्याचा दावाही केला आहे. ईडीने असाही आरोप केला आहे की डीके शिवकुमार यांची बेनामी मालमत्ता आणि बँक खात्यातील बेहिशेबी पैशांबाबत चौकशी केली असता त्यांनी तपासात सहकार्य केले नाही. मात्र, बेहिशेबी रकमेबाबत चार साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. १०० तासांहून अधिक चौकशीनंतर डीके शिवकुमार यांना ईडीने ३ सप्टेंबर २०१९ रोजी अटक केली होती.

Web Title: karnataka assembly election 2023 will cbi ed and income tax cases hamper dk shivakumar chances as next karnataka cm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.