Karnataka Assembly Election: दक्षिणेत बिग फाइट; ५,१०२ उमेदवारी अर्ज, ३,६००हून अधिक उमेदवार उतरले रिंगणात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2023 06:54 AM2023-04-22T06:54:23+5:302023-04-22T06:54:35+5:30

Karnataka Assembly Election 2023: कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत (२० एप्रिल) ३६०० हून अधिक उमेदवारांनी एकूण ५१०२ उमेदवारी अर्ज दाखल केले, अशी माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी येथे दिली.

Karnataka Assembly Election: Big Fight in South; 5,102 nominations, more than 3,600 candidates entered the fray | Karnataka Assembly Election: दक्षिणेत बिग फाइट; ५,१०२ उमेदवारी अर्ज, ३,६००हून अधिक उमेदवार उतरले रिंगणात

Karnataka Assembly Election: दक्षिणेत बिग फाइट; ५,१०२ उमेदवारी अर्ज, ३,६००हून अधिक उमेदवार उतरले रिंगणात

googlenewsNext

बंगळुरू : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत (२० एप्रिल) ३६०० हून अधिक उमेदवारांनी एकूण ५१०२ उमेदवारी अर्ज दाखल केले, अशी माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी येथे दिली. 

१३ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. एकूण ४७१० नामांकनांपैकी अर्ज ३३२७ पुरुष उमेदवारांनी, तर ३९१ अर्ज ३०४ महिला उमेदवारांनी दाखल केले आहेत. एक अर्ज तृतीयपंथीयाने दाखल केला आहे. गुरुवारी, सहाव्या आणि शेवटच्या दिवशी अनेक दिग्गज नेत्यांसह १६९१ उमेदवारांनी १९३४ उमेदवारी अर्ज दाखल केले.

भाजपकडून भ्रष्टाचाराचे समर्थन : काँग्रेस
नरेंद्र मोदी कर्नाटकचे माजी मंत्री के. एस. ईश्वरप्पा यांच्याशी फोनवरून बोलल्यानंतर काँग्रेसने भाजपवर भ्रष्टाचाराचे समर्थन केल्याचा आरोप केला. निवडणुकीत तिकीट नाकारल्यानंतरही बंडखोरी न केल्याबद्दल पंतप्रधानांनी ईश्वरप्पांचे अभिनंदन करणे हे स्वीकारार्ह नाही, असे काँग्रेसने म्हटले आहे.

माजी मंत्री ईश्वरप्पांना पंतप्रधानांचा फोन 
- आपल्या मुलाला उमेदवारी न देताही भाजपच्या विजयासाठी प्रयत्न करत असल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी मंत्री के. एस. ईश्वरप्पा यांचे कौतुक केले.
- तुमच्या पक्षाप्रतिच्या बांधिलकीने मी प्रभावित झालो आहे, असे मोदी त्यांना म्हणाले. 
- राजकारणातून निवृत्तीची घोषणा करणाऱ्या ईश्वरप्पा यांनी व्हिडीओ शेअर केला असून, यात ते मोदींशी फोनवर बोलताना दिसत आहेत. पंतप्रधानांना असे म्हणताना ऐकू येते की, ‘तुम्ही पक्षाप्रतिची बांधिलकी दाखवून दिली. म्हणून मी तुमच्याशी बोलायचे ठरवले. मी जेव्हा कर्नाटकात येईन, तेव्हा तुम्हाला नक्कीच भेटेन.’ 

Web Title: Karnataka Assembly Election: Big Fight in South; 5,102 nominations, more than 3,600 candidates entered the fray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.