शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकहिताचा निर्णय रद्द कराल, तर तुमचाच करेक्ट कार्यक्रम होईल; CM शिंदे यांचा विरोधकांना इशारा
2
Video - भयंकर! नायजेरियात पेट्रोलचा टँकर उलटल्याने भीषण अपघात; १४७ जणांचा मृत्यू
3
आजचे राशीभविष्य: ६ राशींना धनलाभ, येणी वसूल होतील; मन प्रसन्न होईल, शुभ फलदायी दिवस
4
संभाव्य बंडाळी टाळण्यासाठी भाजपची आधीच डॅमेज कंट्रोल मोहीम; तीन आघाड्यांवर राबवताहेत मोहीम
5
आतापर्यंत 1,658 महिला लढल्या, पण विजयी झाल्या फक्त 161
6
विधानसभा जिंकू आणि सत्ता आणू : राज ठाकरे
7
महायुती सरकारचे विकासाचे दावे खोटे; नाना पटोलेंची टीका
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी, महागाई भत्ता ३% वाढला
9
जीआरमुळे आचारसंहिता भंग झाली का, ‘व्होट जिहाद’ शब्दही तपासणार - चोक्कलिंगम 
10
न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी काढली; हातात तलवारीऐवजी संविधान!
11
काँग्रेसची ६० नावे निश्चित! छाननी समितीची दिल्लीत चर्चा; २० तारखेनंतर येणार पहिली यादी
12
शेतकऱ्यांना माेठा दिलासा, सरकारने वाढविले दर; गव्हाच्या एमएसपीमध्ये १५० रुपये वाढ
13
"जयंत पाटलांमध्ये महाराष्ट्र सांभाळण्याची..."; शरद पवारांचे सूचक विधान, नेमकी चर्चा काय?
14
VBA Candidate List 2024: आंबेडकरांनी 30 उमेदवारांची केली घोषणा; आदित्य ठाकरेंविरोधात कोण?
15
"मुख्यमंत्री होण्यासाठी लय उठाबशा काढाव्या लागतात"; जयंत पाटलांची कार्यकर्त्याला तंबी
16
नागपूर : न केलेल्या गुन्ह्यात १९ दिवस गेला कारागृहात अन्...; पोलिसांच्या चुकीची भोगतोय शिक्षा
17
विधानसभा निवडणूक लढणार की नाही? बावनकुळेंचं उमेदवारीबद्दल पहिल्यांदाच भाष्य
18
श्याम मानव यांच्या कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ, नक्की काय घडलं?
19
'ट्रूडोंसोबत माझे थेट संबंध, मीच भारतविरोधी माहिती पुरवली', खालिस्तानी पन्नूचा मोठा खुलासा

कर्नाटकात कोणत्या पक्षात कोणते चेहरे आहेत मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2023 9:53 AM

जाणून घ्या, कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री पदासाठी कोणते संभाव्य उमेदवार आहेत.

बंगळुरू : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी १० मे रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत काँग्रेस-भाजप आणि जेडीएस यांच्यातच मुख्य लढत पाहायला मिळणार आहे.  काँग्रेस आणि भाजप हे दोन्ही पक्ष विजयाचा दावा करत आहेत, मात्र राज्याच्या भावी मुख्यमंत्र्याच्या नावाची घोषणा कोणीही केलेली नाही. तसेच, राज्यातील तिसरा मोठा पक्ष जेडीएसने आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराचे नाव निश्चितपणे जाहीर केले आहे. एचडी कुमारस्वामी हे जेडीएसकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा आहेत. यापूर्वीही ते मुख्यमंत्री राहिले आहेत. अशा परिस्थितीत जाणून घ्या, कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री पदासाठी कोणते संभाव्य उमेदवार आहेत.

कर्नाटकात सध्या भाजपचे सरकार आहे आणि बसवराज बोम्मई मुख्यमंत्री आहेत. मात्र भाजपने मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याशिवाय निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.  अशा परिस्थितीत कर्नाटकात भाजपची सत्ता परत आल्यास बसवराज बोम्मई यांचा मुख्यमंत्रीपदाचा दावा आपोआप बळकट होईल. भाजपने शिगगाव विधानसभा मतदारसंघातून बसवराज बोम्मई यांना तिकीट दिले आहे. तर कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा हे भेलमधून निवडणूक लढवत नाहीत तर ते कर्नाटकातील भाजपचे पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. ते लिंगायत समाजातून आले असून दक्षिणेकडील राज्यात भाजपला सत्तेवर आणण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.  अशा स्थितीत निवडणूक जिंकल्यास भाजप मुख्यमंत्री पदासाठी त्यांचे नाव समोर करू शकते. पण, त्यांचे वय त्यांच्या मार्गात अडथळा बनू शकते. ते निवडणूक लढवत नसतील पण त्यांचा मुलगा विजयेंद्र शिकारीपुरा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे.

भाजपमध्ये मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि बीएस येडियुरप्पा यांच्याशिवाय केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी हे देखील कर्नाटकातील भाजपचा संभाव्य मुख्यमंत्री पदाचा चेहरा आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जोशींना मुख्यमंत्री बनवण्याचा प्रयत्न  असल्याचा दावाही जेडीएस नेते एचडी कुमारस्वामी यांनी केला होता.  आठ उपमुख्यमंत्र्यांसह त्यांना मुख्यमंत्री बनवण्याची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची योजना आहे. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते जगदीश शेट्टर हेही मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत. जगदीश शेट्टर हे हुबळी-धारवाडचे विद्यमान आमदार आहेत.  मात्र, भाजपच्या पहिल्या यादीत शेट्टर यांना तिकीट मिळालेले नाही.

काँग्रेस सुद्धा कर्नाटकात आपली सत्ता येईल, अशी आशा आहे.  त्यामुळे पक्षात मुख्यमंत्रीपदासाठी आतापासूनच रस्सीखेच सुरू झाली आहे.  या शर्यतीत काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आघाडीवर आहेत. मात्र त्यांचे विरोधक त्यांना रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसत आहेत. त्यांच्याशिवाय पक्षाचे दिग्गज नेते डीके शिवकुमार हेही मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत. सध्या ते कर्नाटकात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असून अनेकवेळा त्यांनी पक्षाला संकटातही मदत केली आहे. अशा स्थितीत त्यांचा दावाही भक्कम आहे. याशिवाय, जी परमेश्वर सुद्धा मुख्यमंत्री पदासाठी शर्यतीत आहेत. त्यांनी आधीच मुख्यमंत्री बनण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसेच, ते पाच वेळा आमदार म्हणून निवडणूक आले आहे. एचडी कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस-जेडीएस आघाडी सरकारमध्ये ते उपमुख्यमंत्री होते. एम बी पाटील हे लिंगायत समाजातून येतात. ते सुद्धा मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आहेत.

टॅग्स :Karnatakकर्नाटकKarnatak Politicsकर्नाटक राजकारण