शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: बविआने पैसे वाटताना पकडले? विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया...
2
Vinod Tawde विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, विरारमध्ये मोठा राडा; भाजपा म्हणते, ही तर स्टंटबाजी
3
Vinod Tawde News "मला भाजपवाल्यांनीच सांगितले की ते..."; विनोद तावडेंनी पैसे वाटल्याच्या आरोपांवर ठाकुरांचा मोठा दावा
4
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
5
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
6
स्पेस स्टेशनमध्ये सुनीता विल्यम्सची तब्येत बिघडली, वजन कमी होत आहे? स्वत: दिली माहिती
7
Gold Silver Rates Today : लग्नसराईच्या हंगामादरम्यान सोन्या-चांदीच्या दरात तेजी, पटापट चेक करा आजचे नवे दर
8
उत्तर प्रदेशमधील पोटनिवडणुकीत या जागांवर एनडीए तर या मतदारसंघात इंडियाचं पारडं जड
9
मतदारांना लागणार चंदनाचा टिळा अन् मिळणार तुळशीचे रोप; पनवेल ठरणार लोकशाहीच्या उत्सवाचे मॉडेल
10
"महाविकास आघाडीचा खोटं बोलून सत्तेत यायचा प्रयत्न"; धनंजय मुंडेंचं टीकास्त्र
11
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?
12
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
13
Naga chaitanya-Sobhita wedding: शोभिता नेसणार कांजीवरम साडी पण...; काय आहे खास?
14
३८ टक्क्यांनी घसरला शेअर, आता रेटिंग वाढलं; गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
15
गृहपाठ न केल्याने शिक्षक झाला हैवान; मुलाला काठीने केली मारहाण, डोळ्याला गंभीर दुखापत
16
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
17
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन
18
४ सरकारी बँकांतील हिस्सा विकण्याचा मोदी सरकारचा विचार, शेअरमध्ये मोठी वाढ
19
नवीन घर घेण्यासाठी तुम्ही पीएफमधून पैसे काढू शकता का? जाणून घ्या सविस्तर...
20
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!

Karnataka Assembly Election: मोदींचा चेहराही निष्प्रभ, या पाच कारणांमुळे कर्नाटकात भाजपाचा झाला दारुण पराभव

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2023 3:44 PM

Karnataka Assembly Election Result 2023: दारुण पराभवाबरोबरच भाजपाच्या जागांमध्ये लक्षणीय अशी घट झाली आहे. भाजपाच्या कर्नाटकमधील पराभवामध्ये पाच कारणं निर्णायक मानली जात आहेत. ती पुढील प्रमाणे आहेत.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाचा दारुण पराभव झाला आहे. आतापर्यंतच्या कलांमध्ये काँग्रेसने १३० हून अधिक जागांवर आघाडी घेतली  असून, त्यांच्याकडे निर्विवाद बहुमत आहे. तर भाजपाच्या जागांमध्ये लक्षणीय अशी घट झाली आहे. भाजपाच्या कर्नाटकमधील पराभवामध्ये पाच कारणं निर्णायक मानली जात आहेत. ती पुढील प्रमाणे आहेत.

नेतृत्वयातील पहिलं कारण म्हणजे नेतृत्व होय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रूपात भाजपाकडे लोकप्रिय नेतृत्व असलं तरी स्थानिक पातळीवर प्रभावी नेते नसल्याच मोदींच्या नेतृत्वाचा प्रभाव पडत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. कर्नाटकमध्ये प्रभावशाली नेते असलेल्या येडियुरप्पा यांना बाजूला करून बोम्मई यांच्याकडे नेतृत्व सोपवण्याचा डाव भाजपावर उलटला. बोम्मई मुख्यमंत्री म्हणून फार प्रभाव पाडू शकले नाहीत. तसेच लक्ष्मण सवदी, जगदीश शेट्टार यांसारख्या नेत्यांना डावलणेही भाजपाला महागात पडले. उलट सिद्धारमैय्या आणि डी.के. शिवकुमार यांच्या रूपात काँग्रेसकडे स्थानिक पातळीवर प्रभावी नेतृत्त्व होते त्याचा फायदा काँग्रेसला झाला.

भारत जोडो यात्रा राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला कर्नाटकमध्ये जबरदस्त प्रतिसाद लाभला होता. या यात्रेने राज्यातील काँग्रेसमध्ये उत्साह निर्माण करण्याचं काम केलं होतं. तसेच या यात्रेमुळे काँग्रेसबाबत जनतेच्या मनात अनुकूल मत तयार होण्यासही मदत झाली आणि त्याचं चित्र निकालामधून दिसलं.

भ्रष्टाचाराचे आरोपएकीकडे केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भ्रष्टाचाराविरोधात आक्रमक भूमिका घेत असले तरी बोम्मई सरकार भ्रष्टाचारावरून बदनाम झालं होतं. ४० टक्के कमिशनवालं सरकार हा काँग्रेसने लावून धरलेला मुद्दा जनतेला बऱ्यापैकी अपिल झाला. त्यामुळे प्रचाराच्या सुरुवातीच्या टप्प्यातच राज्यात भाजपाविरोधी वातावरण निर्माण झाले होते.

हिंदुत्त्वाच्या मुद्द्याचा अतिरेक हिंदुत्व हे भाजपासाठी निवडणुकीत जनमत निर्माण करण्यासाठी महत्त्वाचे ठरत असले तरी कर्नाटकमध्ये या मुद्द्याचा अतिरेक भाजपावरच उलटल्याचं चित्र आहे. प्रचारात अखेरच्या क्षणी नरेंद्र मोदींनी बजरंग दलाला बजरंगबलीशी जोडणंही मतदारांना तितकंस रुचल्याचं दिसलं नाही. हिंदुत्वाची प्रयोगशाळा मानल्या जाणाऱ्या कोस्टर कर्नाटकमध्येही भाजपाची पीछेहाट झाली. 

लिंगायत दुरावलेकर्नाटकमधील लिंगायत समाज हा सर्वात प्रभावी समजला जातो. दरम्यान, सुरुवातील या समाजातील लोकप्रिय नेते येडियुरप्पा यांना महत्त्व न देणे तसेच जगदीश शेट्टार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला तिकीट न देणे अशा गोष्टींमुळे लिंगायत समाज भाजपापासून दुरावल्याचे दिसून आले. त्याचा मोठा फटका पक्षाला सेंट्रल कर्नाटक आणि मुंबई कर्नाटकमध्ये बसल्याचे दिसून आले.

टॅग्स :Karnataka Electionकर्नाटक विधानसभा निवडणूकBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीYeddyurappaयेडियुरप्पा