२०० युनिटपर्यंत मोफत वीज, प्रत्येक कुटुंबाला २ हजार रुपये, बजरंग दल, PFI'वर बंदी; काँग्रेसची आश्वासने

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2023 11:31 AM2023-05-02T11:31:21+5:302023-05-02T12:27:47+5:30

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने घोषणा पत्र प्रसिद्ध केले आहे.

karnataka assembly election ongress manifesto know highlights | २०० युनिटपर्यंत मोफत वीज, प्रत्येक कुटुंबाला २ हजार रुपये, बजरंग दल, PFI'वर बंदी; काँग्रेसची आश्वासने

२०० युनिटपर्यंत मोफत वीज, प्रत्येक कुटुंबाला २ हजार रुपये, बजरंग दल, PFI'वर बंदी; काँग्रेसची आश्वासने

googlenewsNext

कर्नाटकात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. सर्वपक्षीयांकडून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. कर्नाटकात काँग्रेस विरुद्ध भाजप अशी लढत आहे. विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी राजकीय पक्ष जोरदार प्रयत्न करत आहेत. प्रचारासोबतच पक्ष निवडणुकीतील आश्वासने देऊन जनतेला आकर्षित करण्यात व्यस्त आहेत. काँग्रेसने आज निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला, यामध्ये अल्पसंख्याक समाजाच्या लोकांकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. जाहीरनाम्यात काँग्रेसने बजरंग दलाची तुलना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाशी केली असून कर्नाटकात त्यांचे सरकार स्थापन झाल्यास त्यावर बंदी घालण्याचे आश्वासन दिले आहे. या जाहीरनाम्यात अनेक मोठ्या घोषणा दिल्या आहेत.

२०० युनिटपर्यंत मोफत वीज देण्याचे आश्वासन
कर्नाटकात सरकार आल्यावर प्रत्येक कुटुंबाला दरमहा २०० युनिट वीज मोफत दिली जाईल, असे आश्वासन काँग्रेस पक्षाने जाहीरनाम्यात दिले आहे. यासोबतच प्रत्येक कुटुंबातील महिला प्रमुखाला दरमहा २००० रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. याशिवाय दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना दरमहा  १० किलो धान्य देण्याची घोषणा काँग्रेसने केली आहे. बेरोजगारांना २ वर्षांसाठी दरमहा ३००० रुपये आणि डिप्लोमाधारकांना १५०० रुपये प्रति महिना दिले जातील, असंही जाहीरनाम्यात आहे. 

'युवक निधी अंतर्गत बेरोजगार पदवीधरांना प्रत्येकी ३००० रुपये आणि बेरोजगार पदविकाधारकांना प्रत्येकी १५०० रुपये दिले जातील, काँग्रेस पक्षाने जाहीरनाम्यात म्हटले आहे. जाहीरनामा प्रसिद्ध करताना काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत सर्व आश्वासनांची अंमलबजावणी सरकार स्थापनेच्या पहिल्याच दिवशी केली जाईल, अशी सहावी हमी मी देतो.

'बेंगळुरूसह संपूर्ण राज्यात महिलांना मोफत बस प्रवासाची सुविधा दिली जाणार आहे. पक्ष सरकार स्थापनेनंतर जुन्या पेन्शन योजनेचाही विचार करेल. बजरंग दल आणि पीएफआय यांसारख्या संघटनांवर कायद्यानुसार कारवाई केली जाईल आणि त्यांच्यावर बंदीही घालण्यात येईल. मुस्लिम, ख्रिश्चन, जैन बौद्ध या धार्मिक अल्पसंख्याकांसाठी १० हजार कोटींची तरतूद वाढवणार असल्याचे काँग्रेसने निवडणूक जाहीरनाम्यात जाहीर केले आहे. 

Arun Gandhi Passes Away : महात्मा गांधींचे नातू अरुण गांधी यांचे कोल्हापुरात निधन

अल्पसंख्यांक महिलांना विना व्याज तीन लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळेल. लहान मठ आणि मंदिरांच्या पुनर्बांधणीसाठी १००० कोटी दिले जाणार. सुविधा वाढवण्यासाठी १००० कोटी रुपयेही दिले जाणार आहेत. त्याचबरोबर ३५००० मंदिरांसाठी पूजेचा निधी तयार करण्यात येणार आहे. दरमहा अनुदान दिले जाईल, असंही या जाहीरनाम्यात आहे. 

Web Title: karnataka assembly election ongress manifesto know highlights

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.