karnataka assembly elections 2018- मोदी आणि राहुल गांधींचा एकमेकांवर हल्लाबोल, बघा कोण काय बोललं ?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2018 05:40 PM2018-05-03T17:40:50+5:302018-05-03T17:40:50+5:30

कर्नाटक विधानसभा निवडणुकीची तारीख जस जशी जवळ येतेय. त्याप्रमाणेच काँग्रेस आणि भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत.

karnataka assembly elections 2018- Modi and Rahul Gandhi's attack on one another, see who said? | karnataka assembly elections 2018- मोदी आणि राहुल गांधींचा एकमेकांवर हल्लाबोल, बघा कोण काय बोललं ?

karnataka assembly elections 2018- मोदी आणि राहुल गांधींचा एकमेकांवर हल्लाबोल, बघा कोण काय बोललं ?

Next

कलबुर्गी- कर्नाटक विधानसभा निवडणुकीची तारीख जस जशी जवळ येतेय. त्याप्रमाणेच काँग्रेस आणि भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदीही प्रचारात सक्रिय झालेत. आज दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांवर घणाघाती टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कलबुर्गीतल्या सभेत राहुल गांधी आणि काँग्रेसवर निशाणा साधला होता. त्यालाच बेल्लारीच्या रॅलीत राहुल गांधींनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. तसेच राहुल गांधी यांनी बीदरच्या सभेतही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, भाजपा उत्तर भारतीयांचं पक्ष असल्याचं पसरवण्यात येतंय. परंतु व्यंकय्या नायडूंना उपराष्ट्रपती आणि निर्मला सीतारामण यांना संरक्षणमंत्री भाजपानंच केलं आहे. त्यानंतर राहुल गांधींही मोदींवर पलटवार केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी- आमच्या जवानांनी सर्जिकल स्टाइकनं दहशतवाद्यांना घाम फोडला आहे. परंतु काँग्रेस पक्ष निर्लज्जासारखा सर्जिकल स्ट्राइकचे पुरावे मागतोय. 
राहुल गांधी- रेड्डी ब्रदर्सला भाजपा विधानसभेवर पाठवू इच्छित होते. गब्बर सिंह टॅक्स(जीएसटी)नंतर आता पुरा गब्बर सिंह गँग तयार झाली आहे. इथे तर गब्बरची पूर्ण गँग कालिया, सांबा आहे. 
पंतप्रधान नरेंद्र मोदी- काँग्रेसचे सर्वात मोठे नेते वंदे मातरम् चा अवमान करतात. त्यामुळे त्यांचा देशाप्रति सकारात्मक भाव असणं कठीण आहे. कर्नाटकात गेल्या निवडणुकीत काँग्रेसनं मल्लिकार्जुन खरगेंना मुख्यमंत्री बनवण्याचं आश्वासन दिलं होतं. परंतु सत्ता येतात त्यांचा पत्ता कट करण्यात आला.  
राहुल गांधी- मोदींचे मित्र अमित शाह यांचे पुत्र जय शाह यांच्या कंपनीनं 50 हजारांवरून थेट 80 कोटींपर्यंत मजल मारली. मोदी यावर काहीच बोलत नाही. सरळ सरळ बोलायचं झाल्यास ही चोरी आहे.  
पंतप्रधान नरेंद्र मोदी- आमच्या सध्याच्या लष्कर प्रमुखांना काँग्रेसच्या एका नेत्यानं गुंडही म्हटलं आहे. परंतु काँग्रेसनं त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी सन्मान केला. 
राहुल गांधी- जेव्हा मोदी घाबरतात तेव्हा ते कोणाची ना कोणाची तरी बदनामी करतात. त्यांनी माझ्याबद्दल काहीही वाईट बोललं तरी मला फरक पडत नाही. मी आमच्या पंतप्रधानांवर व्यक्तिगत हल्ला करणार नाही.  
पंतप्रधान नरेंद्र मोदी- मी दिल्लीला कँडल मार्च काढणा-यांना विचारू इच्छितो की, जेव्हा बीदरमध्ये दलित मुलीवर अत्याचार झाला त्यावेळी तुमची कँडल लाइट कुठे होती ?
राहुल गांधी- खरंच जर मोदींच्या मनात तुमच्याबद्दल जागा असेल, तर सिद्धरामय्या यांनी 8 हजार कोटी रुपयांची कर्नाटकातील शेतक-यांची केलेल्या कर्जमाफीची प्रशंसा करायला हवी.
पंतप्रधान नरेंद्र मोदी- कर्नाटकात सिद्धारुपय्या सरकार आहे. या सरकारनं कर्नाटकाला कर्जाच्या ओझ्याखाली दाबून टाकलं आहे. जर 'रुपय्या' सरकार कुकर्मामुळे कर्जाच्या ओझ्याखाली दबलं असताना काँग्रेसच्या मंत्र्यांचा खजिना कसा भरतोय?. बेल्लारीतून जेव्हा मॅडम सोनिया गांधी निवडणूक लढल्या होत्या. त्यावेळी त्यांनी 3 कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली होती. सोनिया गांधी निवडणूक जिंकल्यानंतर त्यांनी दिलेलं आश्वासनं हवेत विरली. 

Web Title: karnataka assembly elections 2018- Modi and Rahul Gandhi's attack on one another, see who said?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.