शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
2
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : अजित पवारांसह अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क; अनेक ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड!
4
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
5
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
6
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
7
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
8
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
9
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
10
Vaibhav Suryavanshi: १३ वर्षांच्या मुलाला उघडेल आयपीएलचं दार?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
12
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
13
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
14
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
15
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
16
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
17
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
18
वाशिम येथे मतदानास सुरुवात; मतदारांना मिळतेय सहकार्य
19
विशेष लेख: हवामानबदल रोखण्याचा ‘खर्च’ कोण उचलणार, यावर खडाजंगी
20
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे

karnataka assembly elections 2018- मोदी आणि राहुल गांधींचा एकमेकांवर हल्लाबोल, बघा कोण काय बोललं ?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2018 5:40 PM

कर्नाटक विधानसभा निवडणुकीची तारीख जस जशी जवळ येतेय. त्याप्रमाणेच काँग्रेस आणि भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत.

कलबुर्गी- कर्नाटक विधानसभा निवडणुकीची तारीख जस जशी जवळ येतेय. त्याप्रमाणेच काँग्रेस आणि भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदीही प्रचारात सक्रिय झालेत. आज दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांवर घणाघाती टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कलबुर्गीतल्या सभेत राहुल गांधी आणि काँग्रेसवर निशाणा साधला होता. त्यालाच बेल्लारीच्या रॅलीत राहुल गांधींनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. तसेच राहुल गांधी यांनी बीदरच्या सभेतही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, भाजपा उत्तर भारतीयांचं पक्ष असल्याचं पसरवण्यात येतंय. परंतु व्यंकय्या नायडूंना उपराष्ट्रपती आणि निर्मला सीतारामण यांना संरक्षणमंत्री भाजपानंच केलं आहे. त्यानंतर राहुल गांधींही मोदींवर पलटवार केला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी- आमच्या जवानांनी सर्जिकल स्टाइकनं दहशतवाद्यांना घाम फोडला आहे. परंतु काँग्रेस पक्ष निर्लज्जासारखा सर्जिकल स्ट्राइकचे पुरावे मागतोय. राहुल गांधी- रेड्डी ब्रदर्सला भाजपा विधानसभेवर पाठवू इच्छित होते. गब्बर सिंह टॅक्स(जीएसटी)नंतर आता पुरा गब्बर सिंह गँग तयार झाली आहे. इथे तर गब्बरची पूर्ण गँग कालिया, सांबा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी- काँग्रेसचे सर्वात मोठे नेते वंदे मातरम् चा अवमान करतात. त्यामुळे त्यांचा देशाप्रति सकारात्मक भाव असणं कठीण आहे. कर्नाटकात गेल्या निवडणुकीत काँग्रेसनं मल्लिकार्जुन खरगेंना मुख्यमंत्री बनवण्याचं आश्वासन दिलं होतं. परंतु सत्ता येतात त्यांचा पत्ता कट करण्यात आला.  राहुल गांधी- मोदींचे मित्र अमित शाह यांचे पुत्र जय शाह यांच्या कंपनीनं 50 हजारांवरून थेट 80 कोटींपर्यंत मजल मारली. मोदी यावर काहीच बोलत नाही. सरळ सरळ बोलायचं झाल्यास ही चोरी आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी- आमच्या सध्याच्या लष्कर प्रमुखांना काँग्रेसच्या एका नेत्यानं गुंडही म्हटलं आहे. परंतु काँग्रेसनं त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी सन्मान केला. राहुल गांधी- जेव्हा मोदी घाबरतात तेव्हा ते कोणाची ना कोणाची तरी बदनामी करतात. त्यांनी माझ्याबद्दल काहीही वाईट बोललं तरी मला फरक पडत नाही. मी आमच्या पंतप्रधानांवर व्यक्तिगत हल्ला करणार नाही.  पंतप्रधान नरेंद्र मोदी- मी दिल्लीला कँडल मार्च काढणा-यांना विचारू इच्छितो की, जेव्हा बीदरमध्ये दलित मुलीवर अत्याचार झाला त्यावेळी तुमची कँडल लाइट कुठे होती ?राहुल गांधी- खरंच जर मोदींच्या मनात तुमच्याबद्दल जागा असेल, तर सिद्धरामय्या यांनी 8 हजार कोटी रुपयांची कर्नाटकातील शेतक-यांची केलेल्या कर्जमाफीची प्रशंसा करायला हवी.पंतप्रधान नरेंद्र मोदी- कर्नाटकात सिद्धारुपय्या सरकार आहे. या सरकारनं कर्नाटकाला कर्जाच्या ओझ्याखाली दाबून टाकलं आहे. जर 'रुपय्या' सरकार कुकर्मामुळे कर्जाच्या ओझ्याखाली दबलं असताना काँग्रेसच्या मंत्र्यांचा खजिना कसा भरतोय?. बेल्लारीतून जेव्हा मॅडम सोनिया गांधी निवडणूक लढल्या होत्या. त्यावेळी त्यांनी 3 कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली होती. सोनिया गांधी निवडणूक जिंकल्यानंतर त्यांनी दिलेलं आश्वासनं हवेत विरली. 

टॅग्स :Karnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदी