शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
5
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
6
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
7
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
8
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
9
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
10
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
11
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
12
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
13
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
14
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
15
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
16
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
17
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
18
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
19
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
20
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या

जो पक्ष तुमचं वेल्फेअर करत नाही, त्या पक्षाला फेअरवेल द्या- मोदी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2018 1:59 PM

पंतप्रधान मोदींची काँग्रेसवर घणाघाती टीका

चित्रदुर्ग: कर्नाटकमधील विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येतेय, तसतसे काँग्रेस आणि भाजपाचे एकमेकांवरील हल्ले वाढताना दिसताहेत. आज चित्रदुर्गमध्ये भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. काँग्रेसकडून स्थानिक वीरांचा नव्हे, तर सुलतानांचा सन्मान केला जातो, अशा शब्दांमध्ये मोदी काँग्रेसवर बरसले. जो पक्ष गरिबांचं वेल्फेअर करत नाही, त्या पक्षाला जनतेनं फेअरवेल द्यावं, असं आवाहन मोदींनी यावेळी केलं. 'काँग्रेसला दिल (मन), दलितांची नव्हे, तर केवळ डिलची (व्यवहार) चिंता आहे,' असा घणाघाती हल्ला मोदींनी चढवला.'दलित आईच्या पोटी जन्माला आलेल्या थोर वीरांगना वीरा मरकडी यांना मी वंदन करतो. त्यांच्याकडून आपण शौर्य आणि साहस शिकायला हवं. मात्र देशात एक असा पक्ष आहे, जो राजकारणासाठी इतिहास आणि भावनांचा आदर करत नाही,' अशा शब्दांमध्ये मोदींनी काँग्रेसवर तोंडसुख घेतलं. 'ज्यांची जयंती साजरी करायला हवी, त्यांची जयंती काँग्रेस पक्ष साजरी करत नाही. काँग्रेस पक्ष वीरा मरकडीला विसरला. मात्र मतांसाठी सुलतानांची जयंती बरोबर साजरी केली जाते. हा चित्रदुर्गमधील जनतेचा अपमान आहे,' अशी टीका मोदींनी केली.  काँग्रेसच्या नेत्यांना लोक त्यांच्या डीलमुळेदेखील ओळखतात, असंही मोदींनी जनसभेला संबोधित करताना म्हटलं. 'काँग्रेस पक्ष ना दिलवाल्यांचा आहे, ना दलितांचा आहे, तो फक्त डिलवाल्यांचा आहे,' असा हल्लाबोल मोदींनी केला. यावेळी मोदींनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावरही टीका केली. 'इथले मुख्यमंत्री त्यांच्या सुटकेसमध्ये कॅरेक्टर सर्टिफिकेट घेऊनच फिरतात. त्यांच्या मंत्र्यांवर आरोप होताच, ते लगेच सही करुन सर्टिफिकेट देऊन टाकतात. काँग्रेस पक्ष तुमच्या वेल्फेयरचा विचार करत नसेल, तर त्यांना फेयरवेल देण्याची वेळ आलीय,' असं मोदी म्हणाले.  

टॅग्स :Karnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८Narendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाcongressकाँग्रेस