शहरं
Join us  
Trending Stories
1
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
2
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
3
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
4
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम
5
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 
6
दहा अंकी मोबाईल नंबर तरुणाला करणार करोडपती? साउथच्या सिनेमाने घातलाय 'गोंधळ'; वाचा नेमकं प्रकरण
7
कॅनडातील विमानतळांवर भारतीयांची अतिरिक्त तपासणी होणार नाही; या घोषणेनंतर ट्रुडो सरकारने निर्णय बदलला
8
Adani प्रकरणी SEBI ची पहिली प्रतिक्रिया; अमेरिकेच्या आरोपांवर केलं 'हे' वक्तव्य
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'नवरीचा पत्ता नाही आणि यांनी लग्नाची तयारी केली'; नारायण राणेंचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल
10
'भाजप सरकार आल्यावर वीज अन् पाण्याची बिले भरावी लागतील', अरविंद केजरीवालांचे टीकास्त्र
11
IND vs AUS : 'जानी दुश्मन' ठरला एकदम 'सस्ता'; हर्षित राणाची पहिली विकेट एकदम झक्कास (VIDEO)
12
कॅनडा झालं सुतासारखं सरळ! आता म्हणे- निज्जर हत्याकांडात भारताचा कुठलाही समावेश नाही!
13
पंढरपूर, मंगळवेढ्यासह प्रमुख ३० गावे ठरवणार नवीन आमदार; तुतारी, इंजिन कुणाच्या विजयाचे गणित बिघडवणार?
14
बुध वक्री अस्तंगत: ४ राशींना अडचणी, समस्या; ४ राशींना सर्वोत्तम संधी, सुखाचा वरदान काळ!
15
शेअर बाजार सुस्साट.., Sensex मध्ये २००० अंकांची तेजी; Nifty ५९० अंकांनी वधारला, अदानींचा जोरदार कमबॅक
16
स्पष्ट बहुमत मिळालं नाही तरी भाजपा सरकार स्थापन करणार? असा आहे महायुतीचा 'प्लॅन बी'  
17
बॅक टू बॅक सिनेमांमध्ये का दिसत नाही श्रद्धा कपूर? म्हणाली, "ऐनवेळी रिप्लेस केलं..."
18
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता किती? ४८ तासांत आमदारांसमोर हे आव्हान
19
हालचालींना वेग! बच्चू कडूंना महायुतीसह मविआकडूनही फोन; कोणाला पाठिंबा देणार?
20
"४-५ सिनेमे एकाच दिवशी प्रदर्शित केले तर...", मराठी इंडस्ट्रीबद्दल शरद केळकरचं मोठं वक्तव्य, म्हणाला- "साऊथमध्ये..."

आता 'या' राज्यात NEET विरोधात ठराव मंजूर; वैद्यकीय प्रवेशासाठी CET प्रस्तावित

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2024 2:41 PM

Karnataka Assembly : भाजप आणि जेडीएसच्या जोरदार विरोधानंतरही गुरुवारी (२५ जुलै) हा ठराव मंजूर करण्यात आला.

बंगळुरु : सध्या देशभरात नीट (NEET) प्रकरणावरुन गदारोळ सुरू आहे. नीट या वैद्यकीय प्रवेश परीक्षेतील गैरव्यवहार उघकीस आल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. अनेक राज्य सरकारांनी ही परीक्षा रद्द करण्याबाबत चर्चा केली आहे. दरम्यान, कर्नाटकातील काँग्रेस सरकारनेही नीट विरोधात ठराव मंजूर केला आहे. हा वैद्यकीय शिक्षण आणि कौशल्य विकास राज्यमंत्री शरण प्रकाश पाटील यांनी सादर केला. भाजप आणि जेडीएसच्या जोरदार विरोधानंतरही गुरुवारी (२५ जुलै) हा ठराव मंजूर करण्यात आला.

गेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतच नीटला चुकीचे ठरवून या परीक्षेतून सूट देण्याची आणि सीईटी सिस्टम पुन्हा लागू करण्याची विनंती केंद्र सरकारला करण्यात आली होती. दरम्यान, नीट परीक्षेतील गैरव्यवहाराने शिक्षण व्यवस्थेला हादरवून सोडले आहे. दरम्यान, सुप्रीम कोर्टानेही नीट पेपर रद्द करण्याची मागणी फेटाळून लावली आहे. दरवर्षी लाखो विद्यार्थी नीट परीक्षेत सहभागी होतात. कर्नाटकातूनही या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या हजारोंच्या घरात आहे.

'वन नेशन, वन इलेक्शन' विरोधात ठरावही मंजूरयाचबरोबर, कर्नाटकातील काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारने 'वन नेशन, वन इलेक्शन' विरोधात ठरावही मंजूर केला आहे. ही व्यवस्था लोकशाहीसाठी चांगली नाही, असे कर्नाटक सरकारचे म्हणणे आहे. देशात एकाचवेळी निवडणुका व्हाव्यात, कारण त्यामुळे पैसा आणि वेळ वाचेल, अशी मागणी भाजपकडून अनेक दिवसांपासून केली जात आहे. मात्र असे झाले तर निवडणुकीच्यावेळी राष्ट्रीय मुद्द्यांमध्ये स्थानिक मुद्दे पुढे येणार नाहीत, असे या 'वन नेशन, वन इलेक्शन'च्या विरोधकांचे म्हणणे आहे.

बंगालमध्ये सुद्धा नीटविरोधात प्रस्तावपश्चिम बंगाल विधानसभेने बुधवारी (२४ जुलै) नीट परीक्षा रद्द करण्याचा आणि त्याऐवजी नवीन वैद्यकीय प्रवेश परीक्षा घेण्याचा ठराव मंजूर केला. बंगाल विधानसभेने मंजूर केलेल्या ठरावात नॅशनल टेस्टिंग एजन्सीचा (एनटीए) निषेध करण्यात आला आहे. वैद्यकीय क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत आणि निष्पक्ष परीक्षा घेण्यात अपयशी ठरल्याचा आरोप एनटीएवर करण्यात आला. राज्याचे संसदीय कामकाज मंत्री शोभनदेब चट्टोपाध्याय यांनी मंगळवारी हा प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावात पश्चिम बंगाल सरकारला राज्यात संयुक्त प्रवेश परीक्षा पुन्हा सुरू करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :neet exam paper leakनीट परीक्षा पेपर लीकexamपरीक्षाKarnatakकर्नाटकOne Nation One Electionवन नेशन वन इलेक्शनwest bengalपश्चिम बंगाल