'गुजरात मॉडेल' कर्नाटकात करेल भाजपचं काम तमाम? आठवडाभरातच 6 बड्या नेत्यांचा BJPला 'जय श्रीराम' 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2023 03:01 PM2023-04-17T15:01:52+5:302023-04-17T15:03:53+5:30

यात माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टरांपासून ते माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदींपर्यंत अनेकांचा समावेश आहे. या दोन्ही नेत्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

karnataka assembly poll 2023 bjp may faces challenges by gujarat model Within a week 6 big leaders quits bjp | 'गुजरात मॉडेल' कर्नाटकात करेल भाजपचं काम तमाम? आठवडाभरातच 6 बड्या नेत्यांचा BJPला 'जय श्रीराम' 

'गुजरात मॉडेल' कर्नाटकात करेल भाजपचं काम तमाम? आठवडाभरातच 6 बड्या नेत्यांचा BJPला 'जय श्रीराम' 

googlenewsNext

कर्नाटकात सध्या विधानसभा निवडणुकीची धामदून सुरू आहे.  10 मे रोजी येथे मतदान होणार आहे. मात्र त्यापूर्वीच येथील राजकारण ढवळून निघताना दिसत आहे. सत्ताधारी भाजपने तिकीट कापल्याने माजी मुख्यमंत्री आणि माजी उपमुख्यमंत्र्यांपासून ते विद्यमान आणि माजी आमदारांपर्यंत अनेकांनी भाजपला 'जय श्रीराम' ठोकला आहे. विशेष म्हणजे यातील बहुतांश नेते काँग्रेसच्या वाटेवर दिसत आहेत. गेल्या आठवडा भरात तब्बल आठहून अधिक बड्या राजकीय चेहऱ्यांनी भाजपची साथ सोडली आहे. यात माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टरांपासून ते माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदींपर्यंत अनेकांचा समावेश आहे. या दोन्ही नेत्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

कुणी कुणी सोडला पक्ष -
भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर करायला सुरुवात केल्यापासूनच अनेक नेत्यांनी पक्ष सोडचिठ्ठी दिली आहे. जगदीश शेट्टर यांनी आज (17 एप्रिल रोजी) काँग्रेस पक्षात प्रवेश केला. तर माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदी यांनी पक्ष सोडल्यानंतर दोनच दिवसात म्हणेच 14 एप्रिल रोजी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होतता. 

बेळगाव जिल्ह्यातील अथणी मतदारसंघातून तीन वेळा आमदार राहिलेले सावदी यांचा 2018 च्या निवडणुकीत महेश कुमथल्ली यांनी पराभव केला होता. तेव्हा कुमथल्ली हे काँग्रेस पक्षाचे उमेदवार होते. आता भाजपने कुमथल्ली यांना तिकीट दिले आहे. तर दुसरीकडे सावदी हे त्यांच्या विरोधात काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवणार आहेत. अर्थात पुन्हा एकदा या दोन नेत्यांमध्येच फाईट होईल. याशिवाय, नेहरू ओलेकर, एमपी कुमारस्वामी, एमएलसी आर शंकर आणि गुलीहट्टी डी शेखर यांनी भाजपची साथ सोडली आहे.

तसेच, भाजपचे ज्येष्ठ नेते केएस ईश्वरप्पा यांनी, आपण आगामी निवडणूक लढणार नाही आणि निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्ती घेणार असल्याचे म्हटले आहे. ईश्वरप्पा यांनी राज्य सरकारमध्ये अनेक महत्वाच्या पदांवर काम केले आहे. ते उपमुख्यमंत्री आणि ग्रामीण विकास आणि पंचायत राज मंत्रीही होते.

काय आहे भाजपचे 'गुजरात मॉडेल'? -
भाजप प्रत्येक निवडणुकीत सुमारे 30 टक्के आजी आमदार आणि मंत्र्यांचे तिकीट कापून नव्या आणि तरुण उमेदवारांना मैदानात उतरवत असते. हा प्रयोग सर्वप्रथम गुजरातमध्ये करण्यात आला होता. मात्र नरेंद्र मोदी आणि अमित शाह सर्व राज्यांमध्ये हा प्रयोग करत आहेत. यामुळे पक्षातील नव्या नेत्यांनाही संधी मिळते. 

Web Title: karnataka assembly poll 2023 bjp may faces challenges by gujarat model Within a week 6 big leaders quits bjp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.