शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! नागपूर जिल्ह्यात कुटुंबाची सामूहिक आत्महत्या; पती-पत्नीसह दोन मुलांनी घेतला गळफास
2
कधीकाळी जिगरी दोस्त होते इराण-इस्रायल; जानी दुश्मन कसे बनले? सद्दामच्या इराकवर केलेला हल्ला
3
१९७१ आम्ही विसरलो नाही, आधी माफी मागा; बांगलादेशने पाकिस्तानला करून दिली आठवण
4
ख्रिस गेलचा PM मोदींना 'नमस्कार'! भारतीयांना ती शैली भावली; 'युनिव्हर्सल बॉस'ची लक्षवेधी पोस्ट 
5
Sarva Pitru Amavasya 2024: 'या' ठिकाणी करता येते जिवंतपणी श्राद्ध; मात्र हा तोडगा कोणासाठी? वाचा!
6
"रोहित पवार, रोहित पाटील, टोपेंसह ५० उमेदवारांना पाडणार", लक्ष्मण हाकेंची यादी तयार!
7
अजित पवारांनी तटकरे, पटेलांसह घेतली अमित शाहांची भेट, कोणत्या मुद्द्यावर चर्चा?
8
Raj Thackeray : "कितीही बेताल वक्तव्य केली तरी..."; गांधी जयंतीनिमित्त राज ठाकरेंनी वाचाळवीरांना फटकारलं
9
कमाल! WhatsApp ची मोठी घोषणा, Video कॉलचा आनंद द्विगुणित; बदलणार चॅटिंगचा एक्सपीरियन्स
10
T20 WC 2024 : भारताचा विजयरथ! न्यूझीलंड, आफ्रिकेविरुद्ध 'भारी' सराव; गुरुवारपासून स्पर्धेचा थरार
11
फक्त 6 तास अ्न मोसाद इराणचे 100000 हून अधिक सीक्रेट न्यूक्लिअर डॉक्यूमेन्ट घेऊन 'भूर्र'; माजी राष्ट्रपतींचा दावा
12
गोविंदा गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट, पोलिसांनी व्यक्त केला संशय
13
मुलगी झाली हो..! खुशबू तावडे आणि संग्राम साळवी दुसऱ्यांदा झाले आई-बाबा
14
गुरु-शनी गोचर: ८ राशींचा सुवर्णकाळ, धनलक्ष्मी भरभरुन देईल; नवदुर्गा कृपा करेल, दसरा शुभ होईल!
15
इराण-इस्रायल या दोन्ही दैशांपैकी भारताचा सर्वात जवळचा मित्र कोण?; जाणून घ्या
16
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय तरी काय? आता Babar Azam चा कर्णधारपदाचा राजीनामा!
17
गोविंदाला कधी मिळणार डिस्चार्ज? अभिनेत्याच्या तब्येतीविषयी पत्नी सुनिता आहुजा यांनी दिली माहिती
18
"शिवसेनेमुळे माझा पराभव झाला", समरजित सिंह घाटगेंचं मोठं विधान
19
धक्कादायक माहिती! 'त्या' दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरने सुनील तटकरे करणार होते प्रवास
20
Irani Cup 2024 : अजिंक्य रहाणेचे शतक थोडक्यात हुकले! पण सर्फराजने गड गाठलाच; ऋतुराजचा संघ अडचणीत

'गुजरात मॉडेल' कर्नाटकात करेल भाजपचं काम तमाम? आठवडाभरातच 6 बड्या नेत्यांचा BJPला 'जय श्रीराम' 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2023 3:01 PM

यात माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टरांपासून ते माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदींपर्यंत अनेकांचा समावेश आहे. या दोन्ही नेत्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

कर्नाटकात सध्या विधानसभा निवडणुकीची धामदून सुरू आहे.  10 मे रोजी येथे मतदान होणार आहे. मात्र त्यापूर्वीच येथील राजकारण ढवळून निघताना दिसत आहे. सत्ताधारी भाजपने तिकीट कापल्याने माजी मुख्यमंत्री आणि माजी उपमुख्यमंत्र्यांपासून ते विद्यमान आणि माजी आमदारांपर्यंत अनेकांनी भाजपला 'जय श्रीराम' ठोकला आहे. विशेष म्हणजे यातील बहुतांश नेते काँग्रेसच्या वाटेवर दिसत आहेत. गेल्या आठवडा भरात तब्बल आठहून अधिक बड्या राजकीय चेहऱ्यांनी भाजपची साथ सोडली आहे. यात माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टरांपासून ते माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदींपर्यंत अनेकांचा समावेश आहे. या दोन्ही नेत्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

कुणी कुणी सोडला पक्ष -भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर करायला सुरुवात केल्यापासूनच अनेक नेत्यांनी पक्ष सोडचिठ्ठी दिली आहे. जगदीश शेट्टर यांनी आज (17 एप्रिल रोजी) काँग्रेस पक्षात प्रवेश केला. तर माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदी यांनी पक्ष सोडल्यानंतर दोनच दिवसात म्हणेच 14 एप्रिल रोजी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होतता. 

बेळगाव जिल्ह्यातील अथणी मतदारसंघातून तीन वेळा आमदार राहिलेले सावदी यांचा 2018 च्या निवडणुकीत महेश कुमथल्ली यांनी पराभव केला होता. तेव्हा कुमथल्ली हे काँग्रेस पक्षाचे उमेदवार होते. आता भाजपने कुमथल्ली यांना तिकीट दिले आहे. तर दुसरीकडे सावदी हे त्यांच्या विरोधात काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवणार आहेत. अर्थात पुन्हा एकदा या दोन नेत्यांमध्येच फाईट होईल. याशिवाय, नेहरू ओलेकर, एमपी कुमारस्वामी, एमएलसी आर शंकर आणि गुलीहट्टी डी शेखर यांनी भाजपची साथ सोडली आहे.

तसेच, भाजपचे ज्येष्ठ नेते केएस ईश्वरप्पा यांनी, आपण आगामी निवडणूक लढणार नाही आणि निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्ती घेणार असल्याचे म्हटले आहे. ईश्वरप्पा यांनी राज्य सरकारमध्ये अनेक महत्वाच्या पदांवर काम केले आहे. ते उपमुख्यमंत्री आणि ग्रामीण विकास आणि पंचायत राज मंत्रीही होते.

काय आहे भाजपचे 'गुजरात मॉडेल'? -भाजप प्रत्येक निवडणुकीत सुमारे 30 टक्के आजी आमदार आणि मंत्र्यांचे तिकीट कापून नव्या आणि तरुण उमेदवारांना मैदानात उतरवत असते. हा प्रयोग सर्वप्रथम गुजरातमध्ये करण्यात आला होता. मात्र नरेंद्र मोदी आणि अमित शाह सर्व राज्यांमध्ये हा प्रयोग करत आहेत. यामुळे पक्षातील नव्या नेत्यांनाही संधी मिळते. 

टॅग्स :BJPभाजपाKarnatakकर्नाटकcongressकाँग्रेसKarnatak Politicsकर्नाटक राजकारणElectionनिवडणूक