बंगळुरू - कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांना सुद्धा कोरोनाची लागण झाली आहे. सध्या त्यांची प्रकृती ठीक असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली आहे. तसेच, त्यांनी आपल्या संपर्कातील सर्व लोकांना सेल्फ क्वारंटाइन होण्याचे आणि वैद्यकीय तपासणी करून घेण्याचे आवाहन केले आहे. याचबरोबर, मुख्यमंत्र्यांच्या मुलीचा रिपोर्ट सुद्धा कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. या दोघांनाही ओल्ड एअरपोर्ट रोड येथील मनिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 31 जुलै रोजी मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांची भेट घेतली होती.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. युडियुरप्पा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर म्हटले आहे की, "माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आला आहे. पण, मी ठीक आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, मी रुग्णालयात दाखल झालो आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी तपासणी करावी आणि सेल्फ क्वारंटाईन व्हावे, अशी मी विनंती करतो."
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आल्याने त्यांना रविवारी (दि.२) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अमित शाह यांनी स्वत:च ट्विट करून आपणास संसर्ग असल्याचे नमूद केले. आपली प्रकृती ठीक आहे. गेल्या काही दिवसांत आपल्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाने टेस्ट करून घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्यातही कोरोनाच्या आजाराची काही लक्षणे असल्याचे डॉक्टरांना आढळून आले. मात्र कोणताही त्रास होत नसल्याने पुरोहित यांना घरीच एकटे (होम आयसोलेशन) राहण्याचा सल्ला डॉक्टरानी दिला आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील-निलंगेकर रविवारी यांनीही कोरोनावर मात केली.
आणखी बातम्या....
भारताविरोधात चीनचा नवा डाव, नेपाळला मोहरा बनवून 'या' प्रकल्पाच्या कामाला केली सुरुवात
Sushant Singh Rajput death case: "मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बॉलिवूड माफियांच्या दबावाखाली"
दिग्गजांचे ट्विटर अकाउंट्स हॅक करणाऱ्या १७ वर्षीय मुलानं एका दिवसांत कमावले १ लाख डॉलर
Article 370: ...म्हणून 5 ऑगस्ट हा आमच्यासाठी ऐतिहासिक नव्हे, काळा दिवस; मुफ्तींच्या लेकीची टीका
लवकरच सात नवीन Bullet Trains सुरू होणार; कोणत्या शहरांमध्ये धावणार, जाणून घ्या...