बंगळुरू: नुकताच "777 चार्ली" हा कन्नड भाषेतील चित्रपट प्रदर्शनत झाला. माणूस आणि कुत्र्याच्या नात्यावर आधारित या चित्रपटाने प्रेक्षांची मने जिंकली आहेत. हा चित्रपट पाहून रडू येणार नाही, असा क्वचितच कुणी सापडले. कर्नाटकचेमुख्यमंत्रीमुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनाही हा चित्रपट पाहून अश्री अनावर झाले. हा चित्रपट पाहून बोम्मई यांना त्यांच्या घरातील पाळीव स्नूबी या कुत्र्याची आठवण आली. गेल्या वर्षी त्या कुत्र्याचा मृत्यू झाला.
मुख्यमंत्र्यांना अश्रू अनावरकन्नड चित्रपट "777 चार्ली" 10 जून रोजी प्रदर्शित झाला. हा चित्रपट एक माणूस आणि त्याचा पाळीव कुत्रा चार्ली यांच्यातील बंध दाखवणारा चित्रपट आहे. रिलीज झाल्यापासून या चित्रपटाला लोकांची चांगलीच पसंती मिळत आहे. या चित्रपटातील अभिनेता रक्षित शेट्टी याचे खूप कौतुकही होत आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनीही लोकांनी हा चित्रपट एकदा पाहावा, असे आवाहन केले.
चित्रपट पाहण्याचे आवाहनपत्रकारांशी बोलताना सीएम बोम्मई म्हणाले की, "कुत्र्यांवर यापूर्वी अनेक चित्रपट बनवले गेले आहेत. मात्र हा चित्रपट प्राण्यांच्या माणसाप्रती भावना दाखवतो. कुत्रे त्यांच्या डोळ्यांतून त्यांच्या भावना व्यक्त करतात. चित्रपट खूप चांगला आहे आणि सर्वांनी तो जरूर बघावा. अभिनेता रक्षित शेट्टीचा हा चित्रपट पाहिल्यानंतर मंगळुरू पोलिसांनीही अलीकडेच त्यांच्या नवीनतम स्निफर डॉगचे नाव चार्ली ठेवले आहे. पोलिसांनी कुत्र्यासाठी खास समारंभही आयोजित केला होता. हा चित्रपट हिंदीसह पाच भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे.