गेल्या काही दिवसापूर्वी कर्नाटकात कथित सेक्स स्कॅन्डल उघडकीस आले. यानंतर कर्नाटकात गोंधळ सुरू आहे. आरोपीच्या अटकेसाठी आंदोलन सुरू आहेत. या प्रकरणी खासदार प्रज्वल रेवण्णा यांच्यावर आरोप करण्यात येत आहेत. रेवण्णा गेल्या काही दिवासापसून फरार आहे. त्यांना भारतात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून प्रज्वल रेवण्णा यांचा डिप्लोमॅटिक पासपोर्ट रद्द करण्याची मागणी केली आहे.
याआधी १ मे रोजी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून प्रज्वल रेवण्णा यांना जारी केलेला डिप्लोमॅटिक पासपोर्ट रद्द करून तो परत करण्याचे निर्देश परराष्ट्र व्यवहार आणि गृह मंत्रालयाला द्यावेत अशी विनंती केली होती. रेवण्णा सेक्स स्कँडल उघड झाल्यानंतर प्रज्वल यांनी देश सोडला होता. एसआयटी या प्रकरणाचा तपास करत आहे.
“केजरीवाल यांनी कठोर कारवाई करुन न्याय द्यावा”; निर्भयाच्या आईचे स्वाती मालिवाल यांना समर्थन
हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी जेडीएस आणि देवेगौडा कुटुंबीयांचे नुकसान भरून काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. एचडी कुमारस्वामी यांनी प्रज्वल रेवण्णा यांना भारतात परतण्याचे आवाहन केले आहे. मंगळवारी २२ मे २०२४ रोजी कुमारस्वामी यांनी प्रज्वल रेवण्णा यांना भारतात येण्याचे आवाहन केले कुमारस्वामी म्हणाले, “भारतात परत या आणि तपासात सहकार्य करा. हा खेळ किती दिवस चालणार? तुम्ही राजकारणात पुढे जावे अशी तुमच्या आजोबांची नेहमीच इच्छा होती. जर तुम्हाला त्यांच्या प्रतिष्ठेचा आदर करायचा असेल तर भारतात परत या, असंही कुमारस्वामी म्हणाले.
हसन लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रज्वल रेवण्णा यांना हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पक्षाने त्यांची हकालपट्टी केली. प्रज्वलने २७ एप्रिल रोजी देश सोडला. ते जर्मनीत असल्याची माहिती समोर आली होती. प्रज्वल रेवण्णा हे कर्नाटकातील कथिक सेक्स व्हिडीओ स्कँडल प्रकरणातील मुख्य आरोपी आहेत. या प्रकरणाचा तपास एसआयटी करत आहे.