बंगळुरूमध्ये पावसाने बाधित भागांबाबत एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी व्यासपीठावर संत आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई देखील उपस्थित होते. यावेळी या कार्यक्रमात एक स्वामी आणि मुख्यमंत्री यांच्यात वादावादी झाली या संदर्भात एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ईश्वरानंदपुरा स्वामींनी बोलताना व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांवर आरोप केले, यावेळी मुख्यमंत्री बोम्मई यांनी त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. दुसरीकडे, स्वामी बोलत असताना मुख्यमंत्र्यांनी त्यांचा माईकही हिसकावून घेतल्याचे व्हिडीओत दिसत आहे.
भाजप सरकारवर टीका करताना संत ईश्वरानंदपुरा स्वामी म्हणाले की, आम्ही बंगळुरूमध्ये नेहमीच मुसळधार पाऊस पाहतो, जेव्हा पाऊस पडतो तेव्हा लोकप्रतिनिधी आणि बीबीएमपीचे अधिकारी तिथे जातात. यावर कायमस्वरूपी उपाय नाही. तो कधी सुटणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
'एकदा पाऊस पडला तरी अधिकाऱ्यांना कुठे काम करायचे हेच समजत नाही?, असंही स्वामी म्हणाले, यावेळी मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले. त्यांनी बंगळुरूमध्ये या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.
यादरम्यान एक वेळ अशी आली की जेव्हा स्वामी स्टेजवरून बोलत होते तेव्हा त्यांच्या शेजारी मुख्यमंत्री बोम्मई यांच्यासह अनेक लोक मंचावर बसले होते. स्वामीजींनी मुख्यमंत्र्यांवर आरोप करताच मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या हातातून माईक घेऊन उत्तर दिले. यावेळी मंचावर वादावादीही झाली.
Pariksha Pe Charcha: PM नरेंद्र मोदींची 'परीक्षा पे चर्चा', 38 लाख विद्यार्थ्यांना दिला गुरुमंत्र
"हे फक्त आश्वासन नाही. त्यासाठी प्रकल्प मंजूर झाला असून निधीही आला आहे." "फक्त आश्वासने देणारा मी मुख्यमंत्री नाही. मी वचन दिले तर ते पूर्णही करतो, अन्यथा मी वचन देत नाही.", असंही सीएम बोम्मई म्हणाले.
बेंगळुरूमध्ये मुसळधार पावसामुळे लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यावेळी, मान्सूनच्या पावसाने, बेंगळुरूचे रस्ते पूर्णपणे पाण्याने भरले होते.यामुळे वीज पुरवठ्यात व्यत्यय आल्याने आयटी क्षेत्रातील अनेक कंपन्यांचे काम बंद होते.