शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

महाराष्ट्राच्या नेत्यांवर कायदेशीर कारवाईचा बोम्मई यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2022 7:43 AM

सीमाप्रश्नी कर्नाटकचे हित जपण्याचा ठराव विधानसभेत केला मंजूर. राऊतांवरही टीका.

बंगळुरू : महाराष्ट्राबरोबर असलेल्या सीमाप्रश्नासंदर्भात कर्नाटकच्या हिताचे संपूर्ण रक्षण करण्याचा ठराव कर्नाटक विधानसभेने गुरुवारी एकमताने संमत केला. हा ठराव कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी विधानसभेत मांडला. सीमाप्रश्नाबाबत महाराष्ट्रातील नेते ज्या पद्धतीने वक्तव्ये करीत आहेत, ती आक्षेपार्ह आहेत. महाराष्ट्रातील नेत्यांवर आवश्यकता भासल्यास आम्ही कायदेशीर कारवाई करू, असा इशाराही बोम्मई यांनी दिला.

या ठरावात म्हटले आहे की, महाराष्ट्राने सीमाप्रश्न निर्माण केला असून त्या राज्याचा आम्ही निषेध करतो. कर्नाटकची भूमी, कन्नड भाषा, कन्नड भाषिकांचे हित यांविषयी आम्ही कोणतीही तडजोड करणार नाही. जर कर्नाटकच्या हिताला धक्का लागला तर त्याविरोधात घटनात्मक व कायदेशीर पावले उचलण्याचा इशारा या ठरावात देण्यात आला आहे. 

हा ठराव मंजूर करण्याच्या आधी विधानसभेत बोम्मईंनी सीमाप्रश्नासंदर्भात भाषण केले. त्यांनी सांगितले की, कर्नाटकची एकही इंच जमीन आम्ही कोणालाही देणार नाही. आमच्या राज्याच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलणार आहोत. 

संजय राऊत यांच्यावर केली टीकाचीनने ज्या पद्धतीने भारताच्या भूभागावर आक्रमण केले, त्याच पद्धतीने आम्ही कर्नाटकमध्ये प्रवेश करणार आहोत, असे शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटले होते. त्या वक्तव्याचा कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी निषेध केला. राऊत हे चीनचे एजंट आहेत, असा आरोपही बोम्मई यांनी केला.

टॅग्स :Karnatakकर्नाटकMaharashtraमहाराष्ट्रSanjay Rautसंजय राऊत