जनतेच्या नाही काँग्रेसच्या कृपेवर मी अवलंबून- कुमारस्वामी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2018 10:56 AM2018-05-28T10:56:58+5:302018-05-28T10:56:58+5:30

आपण काँग्रेसच्या कृपेने आहोत.

karnataka cm hd kumaraswamy at mercy of congress and not 6.5 cr people | जनतेच्या नाही काँग्रेसच्या कृपेवर मी अवलंबून- कुमारस्वामी

जनतेच्या नाही काँग्रेसच्या कृपेवर मी अवलंबून- कुमारस्वामी

googlenewsNext

नवी दिल्ली- कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या वेळी लोकांकडे जनादेश मागितला होता. पण तो मिळाला नाही. त्यामुळे आज आपण काँग्रेसच्या कृपेने आहोत, असं विधान कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी 'माझ्या पक्षाने एकट्याने सरकार बनवलेलं नाही. मी लोकांकडे जनादेश मागितला होता. मी कोणाच्याही दबावात न येण्यासाठी जनादेश मागितला होता. पण आज मी काँग्रेसच्या कृपेवर आहे. मी राज्यातील साडेसहा कोटी लोकांच्या दबावात नाही, असं स्पष्टीकरण कुमारस्वामी यांनी दिलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर केंद्रीय मंत्र्यांची भेट घेण्यासाठी दिल्लीला रवाना होण्यापूर्वी शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणं प्राधान्य असल्याचं ते म्हणाले. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यास मी अयशस्वी ठरलो. तर  जर मी मी आपल्या पदाचा राजीनामा देईल, असंही कुमारस्वामी यांनी म्हटलं.

माझ्या पक्षाला बहुमत मिळालं नाही याचा अर्थ लोकांनी मला आणि माझ्या पक्षाला नाकारलं आहे. मी पूर्ण बहुमत देण्याची मागणी केली होती. मी शेतकरी नेत्यांची वक्तव्यं ऐकली आणि त्यांनी मला किती पाठिंबा दिला हेही पाहिले. नेता म्हणून माझ्याही काही मर्यादा आहेत. तरीही शेतकरी कर्जमाफीबद्दलचं माझं धोरण स्पष्ट आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी ही माझी प्राथमिकता आहे, असंही ते म्हणाले. 
कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर कुमारस्वामी व नरेंद्र मोदी यांच्याशी पहिली भेट आहे. सोमवारी सकाळी ते दिल्ली रवाना होतील. त्यानंतर दुपारी राजघाटावर जाऊन महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला श्रद्धांजली अर्पण करतील. 

Web Title: karnataka cm hd kumaraswamy at mercy of congress and not 6.5 cr people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.